शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

‘सूर्या’चा एक थेंब मिळणार नाही

By admin | Published: March 18, 2017 3:06 AM

सूर्या प्रकल्पाचे पाणी वसई-विरार, भार्इंदर आणि मुंबईला पळवून नेल्याने भविष्यात पालघर सह ग्रामीण भागातील सिंचनासह, पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे होणारे हाल सर्वसामान्या

पालघर : सूर्या प्रकल्पाचे पाणी वसई-विरार, भार्इंदर आणि मुंबईला पळवून नेल्याने भविष्यात पालघर सह ग्रामीण भागातील सिंचनासह, पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे होणारे हाल सर्वसामान्यासह लोक प्रतिनिधींच्या लक्षात येऊ लागले असून त्याचे पडसाद पालघरच्या आमसभेत उमटले. त्यामुळे सूर्याचा एकही थेंब बाहेर जाऊ न देण्या बाबत सभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.पालघर पंचायत समितीच्यावतीने लायन्स क्लब हॉलमध्ये शुक्रवारी बोईसरचे आमदार विलास तरे आणि सह अध्यक्ष आ.अमित घोडा ह्यांच्या अध्यक्षतेखाली आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. ह्यावेळी सभापती रवींद्र पागधरे, उपसभापती मनोज संखे, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, तहसीलदार महेश सागर, गटविकास अधिकारी वाय डी जाधव, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे आदि मान्यवर उपस्थित होते.सभेच्या सुरु वातीलाच आपल्या विभागाचे प्रतिनिधी पाठवून गैरहजर राहिलेल्या ८ ते ९ अधिकाऱ्या विरोधात ठराव घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याची मागणी माजी सभापती ह्यांनी केली. याच वेळी २४ आॅगस्ट २०१५ च्या आमसभेत दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्या संदर्भात घेतलेल्या ठरावाचे काय झाले? असा प्रश्न माजी आमदार मनीषा निमकर यांनी उपस्थित केला. ज्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे किंवा निर्णय घेण्याचे अधिकार नसतील त्यांनी कृपया बाहेर जाण्याची मागणी ही सभागृहाने केली.सफाळे पारगावच्या पुलाचे काम संथगतीने चालल्या बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर हे काम पावसाळ्या पूर्वी पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती उपभियंते उदय पालवे ह्यांनी दिली. मात्र, तारापूर अणू ऊर्जा प्रकल्पामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास वाहतुकीसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या बाणगंगा पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे आणि अपूर्णावस्थेत पडून असल्या बाबत विचारणा झाल्यावर रस्त्या आड येणाऱ्या एका मंदिरामुळे हे काम थांबल्याची माहिती पालवे ह्यांनी दिली. ह्या बाबत सर्वांची बैठक बोलावून येत्या १० दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन तहसीलदार सागर ह्यांनी दिले. ह्यावेळी पंचायत समिती मधील निधी वाटपा बाबत होणारा दुजाभाव निमकर ह्यांनी दाखवून देत ह्याबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास आपण न्यायालयात याचिका दाखल करू असेही त्यांनी सांगितले. तर या प्रकरणी विधी मंडळ अधिवेशनात आम्ही दोघे आमदार आवाज उठवू असे सांगितले. (प्रतिनिधी)दोन कोटींची काम अन साडेचार कोटींचे काढले बिल : केळवे पर्यटना साठी शासनाने ४ कोटी २८ लाखाचा निधी मंजूर केला होता. त्यातील २ कोटींची कामे झाली असताना ४ कोटी २८ लाखाची बिले काढण्यात आली आहेत.त्यामुळे ह्यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी सभेत करण्यात आली.एडवण,दातीवरे जिप शाळेत वर्ष २०१३ पासून अनेक शिक्षकाची कमतरता असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणकि भवितव्याशी खेळणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी फैलावर घेऊन त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी केली.‘त्या’ ठेकेदारांवर ‘कृपा’ कशासाठी- सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामे ही मर्जीतील ठेकेदारांना दिली जात असून निकृष्ट दर्जाचे कामे करूनही त्यांची बिले काढली जात असल्याचा आरोप जितू राऊळ ह्यांनी करून सर्व रस्त्यांचे स्ट्रक्चर आॅडिट करण्याची मागणी केली. तिघरे, अंबोडे, दांडी-खटाळी ह्या रस्त्यासाठी बविआचे आमदार विलास तरे ह्यांच्या आमदार निधीतून ५० लाखाचा निधी दिल्याने अनेक वर्षांपासून ग्रामस्थाची मागणी पूर्ण होणार आहे.