- पंकज राऊतबोईसर : तारापूर एमआयडीसीत गुरुवारी झालेला भीषण स्फोट व त्यातून लागलेल्या आगीवर मात करण्यासाठी सुमारे पाच लाख लिटर पाणी व अडीच हजार लीटर फोमचा वापर करून दहा अग्निशमन बंबासह ७० जवानांनी ४० स्फोटाना समर्थपणे तोंड देऊन दहा तास आगीशी झुंज दिली व ती आटोक्यात आणली.नोव्हाफाईन स्पेशालिटीज या कारखान्या मध्ये गुरु वारी (दि. ८) रात्री ११.२८ वाजता झालेला स्फोट झाला तेंव्हा नेमकी कुठल्या रसायनांचे उत्पादन सुरू होते याबाबत खरी व निश्चित माहिती समोर आली नसली तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे येथील प्रादेशिक कार्यालयाने २२ डिसेंबर २०१५ रोजी दिलेल्या कन्सेंटनुसार या कारखान्यात अत्यंत ज्वलनशील रसायनांचे उत्पादन होत होते. त्या उत्पादनांसाठी लागणारा कच्चा माल ही अत्यंत ज्वलनशील असल्यानेच स्फोट व आग या दोन्ही घटना प्रत्येकांचा थरकाप उडवणाºया होत्या.स्फोटाचा कानठळ्या बसवणारा आवाज ऐकताच कॉलची वाट न पाहता क्षणाचाही विलंब न लावता एम आय डी सी च्या तारापूर अग्निशमन दलाचे अधिकारी आनंद परब आपल्या ताफ्यातील तीन बंब व २४ कर्मचाºयांना घेऊन एमआयडीसीच्या इ झोन मधील घटनास्थळी पोहचून आगीशी झुंज ेदेऊ लागले. थोडया थोडया अवधीत ४० स्फोट झाले घातक व ज्वालाग्राही रसायनांची पिंपे आगीसह हवेत उंच उडून फुटत होती त्या मधून निघणाºया प्रचंड मोठया ज्वाळा दूर अंतरावरूनही दिसत होत्या तर तेवढ्याच प्रमाणात आग जमीनीवरही पसरत होती.बघता बघता काही वेळेतच आग शेजारच्या आरती ड्रग, प्राची फार्मास्युटीकल तर मागील बाजूच्या इन्शांत पॉलिकेम, युनिमॅक्स केमिकल, भारत रसायन या पाच कारखान्यात पसरली त्या पैकी भारत रसायन या कारखान्या मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्वलनशील रसायनांचा साठा होता त्या रसायनांपर्यंत आग पोहचून त्यांनीही पेट घेतला प्रसंग अत्यंत गंभीर होता तर आरती ड्रग्स लि. या कारखान्यांची भिंत स्फोटाच्या आवाजाने कोसळून त्या बाजूच्या इमारती चा बराचसा भाग कोसळून त्याचा ढिगारा अस्तव्यस्त पसरला.वारंवार स्फोट होत असल्याने त्याच्या ज्वाळामुळे शेजारील कारखान्यातील रसायने गरम झाल्याने शेजारील कारखान्यातील रसायनांच्या साठयांना आणि प्रक्रिया करण्याच्या प्लँटला आग लागली. प्रक्रिया युनिट हे लोखंडी कॉलमचे बांधकाम असल्याने गरम होऊन कोसळते आणि त्यातील रसायन खाली पडून आग पसरत गेली. अशा परिस्थितीत न डगमगता आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अटीतटीची झुंज जीवावर उदार होऊन प्रदीर्घ काळ सुरूच होती. (उत्तरार्ध उद्याच्या अंकी)कुठेत्या कुठल्या दिशेने कोसळतील याचा आगीच्या लोळा मुळे अंदाज येत नव्हता मृत्यूला कवटाळून अग्निशमन दलाच्या जवानांची आगीशी झुंज पहाटे पर्यंत विश्रांती न घेता सुरूच होती.त्या वेळी खरी कसोटी होती कुणी कामगार आत आहे का त्या दृष्टीने तपासाची चक्र फिरू लागली आतील तापमान प्रचंड होते तर आग व स्फोटा मुळे कमकुवत झालेली इमारती मध्ये शिरणे म्हणजे मृत्यू ला आमंत्रण होते परंतु तोही धोका पत्करून अग्निशमन दलाचे जवान जेवढे शक्य होईल तेवढे आत शिरून चाचपणी केली.कारण स्फोट झालेल्या कारखान्यात किती कामगार कामावर होते व स्फोटा ची चाहूल लागताच किती जण सुखरूप बाहेर पडले किती जखमी झाले याचा ताळमेळ सांगायला कुणीही जबाबदार व्यक्ती समोर आला नव्हता त्या मुळे गोंधळा ची परिस्थिती होतीच दरम्यानच्या काळात शेजारच्या आरती ड्रग या कारखान्या मध्ये तीन निष्पाप कामगारांचे मृतदेह आढळले.त्या मृतदेहांचा पोलिसांनी पंचनामा करून तारापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदना करीता पाठवून अजून कुणी कामगार जिवंत किंवा मृतावस्थेत आहे का याचा कसोशीने शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आले दुसºया दिवशी सकाळी ७ वाजता आग आटोक्यात आली तरी संपूर्ण कारखान्यांमध्ये पाणी आणि फोम मारत किलिंग सुरू ठेवून रात्री 8 वाजता काम संपवले तर या वेळी जिल्हाधिकारी, प्रशांत नारनवरे पोलीस अधीक्षक मंजुनाथ शिंगे, उपविभागीय दंडाधिकारी विकास गजरे, तहसीलदार महेश सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी फतेसीह पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांचे सह पोलीस, महसूल, आरोग्य, प्रदूषण नियंत्रण मंडळ इत्यादी विभागाचे सुमारे १०० अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.फोटो : १२ बोईसर आग>एकीकडे आग, दुसरीकडे स्फोट, तिसरीकडे उडालेल्या पिंपातील पेटत्या रसायनांचे लोळ यांची केली नाही पर्वापेटती पिंप कधी आपल्या दिशेने येऊन अंगावर किंवा बंबावर पडतील याचा काहीही नेम नव्हता ७ किलो च्या प्रेशर ने मिनिटाला ९०० लिटर पाण्याचा फवारा आगीवर सुरू होता पाण्याने भरून आणलेले बंब काही मिनिटात रिकामे होत होते ते पुन्हा भरून आणण्यास काही विलंब लागत होता त्या अवधीत आग पुन्हा डोके वर काढत होती. पहाटे सहाच्या सुमारास सहा तासा नंतर आगीवर काहीसे नियंत्रण मिळविण्यात यश आले.पाणी मारल्यावर जिथे आग अधिक भडकत होती त्या ठिकाणी फोम चा वापर करण्यात आला त्याचीही कमतरता होती अशा प्रसंगी नेहमी प्रमाणे लुपिन कंपनीने २० लिटर चे १० ड्रम फोम, आरती केमिकलने १५ ड्रम, असा एकूण अडीच हजार लिटर फोम वेगवेगळ्या ठिकाणाहून उपलब्ध करून दिला त्या मुळे भडकणाºया आगीवर फोम चा थर करून ब्लँकेट तयार केले गेले व ती तातडीने आटोक्यात आणली गेली.त्यातच फवारलेल्या पाण्या सोबत पेटती रसायन वाहून आग जमिनीवर ही पसरत होती त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांच्या मदतीने एक जेसीबी मागवून वाहून जाणारे रसायन मिश्रित जळते पाणी अडविण्यासाठी मातीचा बांध घातला.करखान्याच्या आतील तापमान आगीमुळे प्रचंड वाढत होते. त्या मुळे कारखान्याच्या इमारती च्या भिंती, बांधकाम व आतील यंत्र सामग्री कमकुवत होऊन प्रचंड वेगात कोसळत होत्या.
‘त्या’ भीषण आगीवर अशी केली जवानांनी मात, ७० जवानांची दहा तास झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 3:18 AM