पालघर : जानेवारी व फेब्रुवारीत मुदत संपणा-या व नव्याने स्थापित झालेल्या जिल्ह्यातील ३९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून या ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासह सदस्यांसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर २७ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.या कार्यक्रमानुसार अर्ज भरण्याची मुदत ५ ते ११ डिसेंबरपर्यंत असेल. त्यांची छाननी १२ डिसेंबर रोजी होईल तर माघार घेण्याची मुदत १४ डिसेंबरपर्यंत आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान होईल. या निवडणुकांमध्ये डहाणू तालुक्यातील १४, पालघर तालुक्यातील १२, विक्र मगड १, वसई ३, मोखाडा २ व तलासरी तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.तालुक्यानिहाय निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीडहाणू तालुका : वंकास , राई , सोगावे, आंबेसरी, बोर्डी, किन्हवली, मोडगाव, जाम्बुगाव, कापशी, सावटा, गांगणगाव, दापचरी, गोवणे, दाभोणपालघर तालुका : उच्छेळी , सालवड, उनभाट, टेम्भीखोडावे, चटाळे, लालोंडे, खानिवडे-गारगाव, शिरगाव, लालठाणे, जलसार, कपासे , मासवणवसई तालुका : अर्नाळा, सायवन, अर्नाळा किल्लाविक्र मगड तालुका : मलवाडामोखाडा तालुका : साये ,किनिस्तेतलासरी तालुका : धिमाणिया , गिरगांव, करंजगाव,कवाडा , कुर्जे,उपलाट, उधवा
एकोणचाळीस ग्रा.पं. च्या निवडणुका जाहीर, २६ डिसेंबरला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 3:09 AM