पालघर - जिल्ह्यातील तलासरी आणि डहाणू तालुक्यात ११ नोव्हेंबर पासून भूकंपाचे कमी-अधिक तीव्रतेचे सुमारे ७०० धक्के बसल्याची नोंद भूकंप मापक यंत्राने घेतल्याची माहिती असून ४.१ रिष्टर स्केल च्या धक्क्याने जिल्हाप्रशासनाची झोप उडवून टाकली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायमस्वरूपी भूकंपमापन केंद्र उभारण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिली.जिल्ह्यात एकामागोमाग सुरू झालेल्या भूकंपाच्या पाशर््वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ह्या भूकंपा दरम्यान सर्व शासकीय अधिकारी व विविध प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास करण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती सादर केली. ह्यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नवनाथ जरे आदी उपस्थित होते. या बैठकीला रिलायन्स गॅस पाईपलाईन, डहाणू थर्मल पॉवर स्टेशन, तारापूर अणू ऊर्जा प्रकल्प, सूर्या प्रकल्प आदी प्रकल्पांच्या अधिकाºयांनी त्यांच्या प्रकल्पामध्ये घेतल्या जात असलेल्या दक्षतेबाबतचे सादरीकरण केले. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन दक्ष असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आश्रमशाळांच्या आवारात तात्पुरती सोय म्हणून तंबू उभारले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या आवारातही आणखी तंबू उभारले जातील. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून न जाता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले असता मागील ३ महिन्यांपासून विद्यार्थी भीतीने शाळेतच येत नसल्याने त्यांचा अभ्यासक्रम बुडाल्याने एन परीक्षेच्या तोंडावर प्रशासनाने त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या काही उपाययोजना आखल्या आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यावर शिक्षणाधिकाºयांच्या बैठकीत त्या संदर्भात उपाय योजले जातील असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.यावेळी कुर्झे धरणाच्या डागडुजीसाठी निधीची मागणी करण्यात आली असून सर्वेक्षण केलेल्या १ हजार ५०० घरापैकी १ हजार ३०० घरांना नुकसानभरपाई देणे, घर बांधणीसाठी स्थानिक गवंड्यांना प्रशिक्षण देणे, गंजलेले विद्युत खांब तात्काळ बदली करणे, हैद्राबाद आणि दिल्ली येथील तांत्रिक यंत्रणा मार्फत सिस्मोमीटर बसवून भूकंपाचे नियमित विश्लेषण करणे, कायमस्वरूपी सिस्मोग्राफीक सेंटर उभारणे आदी बाबत निर्णय घेण्यात आले.तिच्या कुटुंबीयांना भरपाई नाहीचभूकंपा दरम्यान जीव वाचिवण्यासाठी घरातून बाहेर पळणाºया। या दोन वर्षीय मुलीचा दगडावर आपटून झालेला मृत्यू मिळणाºया नैसर्गिक आपत्तीच्या भरपाईच्या निकषात बसत नसल्याने तिच्या कुटुंबियांना कुठलीही आर्थिक मदत मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहाय्यता फंडातून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे.मागील ३ महिन्यापासून तलासरी,डहाणू मध्ये एकावर एक भूकंपाचे धक्के बसून ग्रामस्थ जीव मुठीत धरून आपले जीवन जगत असून अत्यंत भयावह परिस्थिती उद्भवली आहे. वाडा आणि सातपाटी येथे कार्यक्र मासाठी येणाºया मुख्यमंत्र्यांना हाकेच्या अंतरावर असलेल्या भूकंपग्रस्त भागातील जनतेची भेट घ्यावीशी वाटली नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उद्या ते भूकंपग्रस्तांची भेट घेणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.
तलासरी-डहाणूला दोन महिन्यांत भूकंपाचे ७०० धक्के, भूकंपग्रस्तांना मुख्यमंत्री भेटणार की नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 2:41 AM