मोखाडा : रोजगार हमीवरील धामणशेत भागातील १५० मजूरांना तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अखेर मजुरी मिळणार असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी बी. बी. वाणी यांची दिली आहे. त्यांना अर्ज विनंत्या करुनही दाद मिळत नसल्याने लोकमतने त्यांची बाजू २५ एप्रिल रोजी वृत्ताद्वारे मांडली होती.मागेल त्याला काम आणि १५ दिवसात दाम या तत्वावर कार्यरत असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत या मजुरांना मजुरी मिळावी म्हणनू उसनवारी करुन तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत होते.धामणशेत येथील १५० धामणशेत कोशिमशेत ग्रुप ग्रामपंचायत मधील धमानशेत येथील १५० मजुरांनी फेब्रुवारी महिन्यात १२ दिवस कृषी विभााग यंत्रनेच्या मजगी चे काम केले परंतु कृषी विभागातील उद्धट अधिकारी त्यांना उडवा उडवी ची उत्तरे देत होती. परंतु याबाबत लोकमत मध्ये २५ एिप्रलच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करताच मोखाडा कृषी विभागाचे धाबे दणाणले होते.
‘त्या’ १५० मजुरांच्या खात्यावर पैसे जमा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:04 PM