शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

‘त्या’ कर्मचाऱ्यांना अखेर मिळाला न्याय

By admin | Published: January 24, 2017 5:30 AM

पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत सेवेत असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना अखेर नवीन शासननिर्णयानुसार ५० टक्के पदोन्नती

वाडा : पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत सेवेत असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना अखेर नवीन शासननिर्णयानुसार ५० टक्के पदोन्नती दिल्याने ८८ कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे. नवीन निर्णय डावलून पदोन्नती देण्याचा घाट जिल्हा परिषद प्रशासनाने घातला होता. त्यामुळे असंख्य चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार होता. याविरोधात जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते नीलेश गंधे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देवून आक्षेप नोंदवत नवीन शासननिर्णयानुसारच पदोन्नतीची प्रक्रिया एकाच टप्प्यात पूर्ण करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. मागील महिन्यात जिल्हा परिषद प्रशासनाने चतुर्थश्रेणीतील शिपाई पदावर काम करणाऱ्यांमधून कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) व अन्य पदांवर पदोन्नती देण्याची प्रक्रि या सुरु केली होती. परंतु ही पदोन्नतीची प्रक्रिया राबवितांना शासनाच्या नवीन शासननिर्णयाचा अधार न घेता जुन्या १९९७ च्या शासननिर्णयानुसार असलेल्या पदसंख्येच्या २५ टक्के पदे ही पदोन्नतीने भरण्याचा घाट जिल्हा परिषद प्रशासनाने घातला होता. शासनाच्या वित्त विभागाने १४ जानेवारी २०१६ रोजी जारी केलेल्या शासननिर्णयनुसार पदोन्नतीने गट-क मधील जास्तीत जास्त २५ टक्के पदे गट-ड या चतुर्थश्रेणीमधील अर्हताप्राप्त कर्मचाऱ्यांमधून भरण्याची अट सुधारित करून ५० टक्केपर्यंत करण्यात आली आहे. असे असताना जिल्हा परिषद प्रशासन १९९७ च्या शासननिर्णयाचा अधार घेऊन पदसंख्येच्या केवळ २५ टक्के प्रमाणे चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊ पाहत होते. ५० टक्के पर्यंतचा नवीन शासननिर्णय असतांना त्या शासननिर्णयाला डावलून पदोन्नती देणे हे उर्वरीत कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे असेल असे गंधे यांनी पत्रात नमूद करून या संपूर्ण प्रक्रि येवर आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला त्याची दखल घेऊन पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा करावी लागली. जिल्हा प्रशासनाने सोमवारी ५० टक्केप्रमाणे पदोन्नतीची प्रक्रिया राबवून एकूण ८८ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. यात ७० कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक, १५ कर्मचाऱ्यांना व्रणोपचारक तर ३ कर्मचाऱ्यांना वाहनचालक पदावर पदोन्नती दिली आहे. (वार्ताहर)