शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

पालघर जिल्ह्यात हजारो पदे आजही रिक्त

By admin | Published: June 18, 2017 1:56 AM

जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या ३१ विविध विभागांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता असून या तुटवड्यामुळे कार्यालयातील

हितेन नाईक । लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या ३१ विविध विभागांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता असून या तुटवड्यामुळे कार्यालयातील कामाचा भार वाढतच चालला असून त्याचा परिणाम जिल्ह्याच्या विकास कामावर होत आहे.जिल्ह्याच्या विविध पद अनुषेशात जिल्हा परिषद अग्रक्रमावर असून ती मधील वर्ग एक ते वर्ग चार मधील एकूण ३०८९ पदे आज तीन वर्षानंतरही रिक्त आहेत. त्यात महत्वाच्या अशा बाल विकास प्रकल्पाधिकाऱ्यांची बहुसंख्य पदे रिक्त असल्यामुळे कुपोषणासंबंधीचे प्रश्न हाताळण्यावर त्याचा विपरित परिणाम होत आहे.जिल्हा परिषदेच्या या पदभरतीबाबतीत कर्मचाऱ्यांच्या विकल्पाबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून कर्मचाऱ्यांचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर पदभरती प्रस्तावित आहे असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.पालघर जिल्ह्यातील कार्यरत कार्यालयातील एप्रिलपर्यंतची मंजूर व रिक्त पदे खालीलप्रमाणेजिल्हाधिकारी कार्यालय पालघर अंतर्गत उपजिल्हाधिकारी संवर्गातील १३ पदे मंजूर असून २ पदे रिक्त आहेत, तहसीलदार १७ पदे मंजूर तर ५ पदे रिक्त, नायब तहसीलदार ४४ पदे मंजूर तर ७ पदे रिक्त, लेखाधिकारी ३ मंजूर तर १ रिक्त, उपलेखपाल ३ मंजूर तर १ रिक्त, लघुलेखक उच्च व निम्नश्रेणी एकूण ८ मंजूर ५ रिक्त, लघु टंकलेखक २ मंजूर दोनही रिक्त, अव्वल कारकून १४२ मंजूर तर ३३ रिक्त,मंडळ अधिकारी ३४ मंजूर तर ११ पदे रिक्त, लिपिक १८७ तर ४७ पदे रिक्त,तलाठी १८४ तर ४३ पदे रिक्त,वाहनचालक २० मंजूर तर १३ रिक्त, शिपाई १३४ मंजूर तर ४५ पदे रिक्त, कोतवाल १८४ मंजूर तर ७६ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेतील वर्ग १ मधील १०७ पदे मंजूर तर २४ रिक्त,वर्ग २ ची १३२ मंजूर तर ६२ रिक्त,वर्ग ३ ची १३१०२ तर २७६७ रिक्त,वर्ग ४११९८ मंजूर तर २३६ पदे आजही रिक्त अशी एकूण ३०८९ पदे रिक्तच आहेत. पोलीस अधीक्षक व सलंग्न कार्यालयातील वर्ग १ ते वर्ग ४ मधील ३२६४ पदे मंजूर असून पैकी ३०७ पदे रिक्त आहेत. जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयात वर्ग १ ते वर्ग ४ अशी एकूण ४९ पदे मंजूर असली तरी ७ पदे रिक्त आहेत. कामगार उप आयुक्त कार्यालयातील वर्ग १-४ मधून एकूण २४ पदे मंजूर तर १७ पदे रिक्त आहेत. ६)जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विभागातील १५४ मंजूर पदांपैकी ४३ पदे रिक्त आहेत.जिल्हा नियोजन समिती/मानव विकास विभागातील चारही संवर्गातील १९ पदे मंजूर असून ३ पदे रिक्त आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय अंतर्गतची चारही वर्गातील एकूण ४९९ पदे मंजूर असून १५४ पदे रिक्त आहेत. जिल्हा सांख्यिकी अधिकारी कार्यालयातील एकूण १२ पदे मंजूर असून ९ पदे रिक्त आहेत. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजलसर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयातील १८ मंजूर पदे असून १६ पदे रिक्तच आहेत. जिल्हा शल्यचिकित्साक आस्थापनेत चारही वर्गातील ३६० मंजूर पदांपैकी १२६ पदे रिक्त आहेत. समाजकल्याण विभागात एकूण चार वर्गातील ११ पदे मंजूर असून ९ पदे रिक्त आहेत. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील एकूण ६० पदांपैकी ३५ पदे रिक्त आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वसई अंतर्गत ४९ ंपैकी १५ पदे रिक्त आहेत. उत्पादन शुल्क कार्यालयात चारही संवर्गातील ७६ पैकी २६ पदे रिक्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात मंजूर २३४ पदांपैकी ११३ पदे रिक्त आहेत. नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागात १७ मंजूर पदांपैकी १० पदे रिक्त आहेत. अँटी करप्शन ब्युरो अंतर्गत पोलीस उपअधीक्षक १,पोलीस निरीक्षक २ तर पोलीस कर्मचारी ८ अशी पदे रिक्त आहेत. नागरी संरक्षण दलांतर्गत मंजूर १३ पदांपैकी ५ पदे रिक्त आहेत. जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत १४ मंजूर पदांपैकी १४ पदे रिक्त आहेत. इतकी पदे रिक्त असताना हि ती भरण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी कडून शासनाकडे हवा तसा पाठपुरावा होत नाही. कुपोषण दूर करण्याचा प्रक्रि येतील महत्वपूर्ण असणाऱ्या १२ महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात येतील असे आश्वासन महिला बालप्रकल्प विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे ह्यांनी २१ सप्टेंबर २०१६ रोजी मोखाडा दरम्यान दिले होते. ते ही हवेतच विरले आहे.तसेच २८ एप्रिल २०१७ ला तलासरी येथे आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनीही येत्या ७ दिवसात हि रिक्त पदे भरली जातील असे दिलेले आश्वासन फसवे ठरले असून ह्या विभागाचा चार्ज सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी सांभाळत आहेत.तीन वर्षात केलेल्या विकास कामांचा, योजनांचे मोठे भांडवल केंद्र आणि राज्य शासन सर्वत्र करीत असताना जिल्ह्याच्या विकास कामाना वेगाने पुढे नेणारी यंत्रणाच पुरविण्यात सरकार अयशस्वी ठरत आहे.त्याचा विपरीत परिणाम विकास कामावर होताना दिसत आहे.