कासा : डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले येथे दोन साधू व वाहनचालकाची निर्घृण हत्या झाल्याप्रकरणी आणखी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, आतापर्यंत ११० आरोपींना पकडण्यात आले आहे.कासा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक रवी साळुंखे, पोलीस हवालदार नरेश धोडी आणि संतोष मुकणे अशी निलंबित केलेल्या तीन पोलिसांची नावे आहेत. तर ३५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या पालघर पोलीस अधीक्षकांनी बदल्या केल्या आहेत. या पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे या बदल्या झाल्या असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, प्रशासकीय निकड आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने बदल्या केल्याचे पोलीस प्रशासनाने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.१६ एप्रिलला रात्री चोर शिरल्याच्या अफवेमुळे जमावाकडून मुंबईहून गुजरातकडे निघालेल्या दोन साधू व त्यांचा वाहनचालकाची हत्या करण्यात आली होती.या प्रकरणी तत्काळ कासा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर कटारे या दोन अधिकाºयांवर हत्या रोखण्यास अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई याआधी करण्यात आली होती. आता आणखी तीन पोलिसांचे निलंबन केले गेले आहे.>ड्रोनच्या मदतीने तपास सुरूया प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाकडून तपास सुरू असून, या हत्याकांडात सहभागी असलेल्या सुमारे ३५० आरोपींपैकी पोलिसांनी आतापर्यंत ११० आरोपींना पकडले आहे. इतर आरोपी हे जवळपासच्या जंगलात लपल्याची शक्यता असल्याने ड्रोनच्या मदतीने पोलीस तपास करीत आहेत.
साधूंच्या हत्येप्रकरणी आणखी तीन पोलीस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 5:38 AM