नालासोपारा : पूर्वेकडील सेन्ट्रल पार्क येथील मुख्य रस्त्यावरील आयरिश सोसायटीच्या दुकान नंबर ३ मध्ये युनायटेड पेट्रो फायनेंस लिमिटेड या गोल्ड लोन देणाºया कार्यालयावर शुक्रवारी सशस्त्र दरोडा पडला. यावेळी तब्बल अडीच कोटींचे सोने पळवण्यात आले. दिवसाढवळ्या कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांची लूट करून दरोडेखोरांनी जणू पालघर पोलिसांना आव्हानच दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. आता या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी पोलिसांची १० पथके तयार केली आहेत.घटनास्थळी ठाणे येथील डॉग स्क्वॉड पथकाला पाचारण करून काही धागेदोरे मिळतात का याचीही तपासणी करण्यात आली आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली ही चारचाकी गाडी विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडली असून ती सुद्धा चोरीची असल्याचे तपासात उघड झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील पोलीस ठाण्यात याप्रकरणी वाहन चोरीचा गुन्हा दाखल असून तुळिंज पोलिसांची एक टीम तेथे पाठवली आहे. तुळिंज पोलिसांच्या २, विरार पोलिसांची १, नालासोपारा पोलिसांची १, स्थानिक गुन्हे शाखेची १ टीम या गुन्ह्याचा तपास करत आहेत. ठाणे येथील गुन्हे शाखेची एक टीम शुक्रवारी नालासोपाºयात आली होती. राज्यातील सर्व पोलिसांना या दरोड्याची माहिती दिली असून दरोडा उघड करण्यासाठी कंबर कसली आहे. वसई तालुक्यातील लॉजमध्ये २ ते ३ दिवसांपासून कोणी संशयास्पद व्यक्ती रहात होत्या का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. दरोडेखोर ज्या रस्त्याने आले आणि ज्या रस्त्याने गेले तेथील सर्व सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी मिळवले आहे. आता याच आधारे तपास सुरू आहे.नेमकी घटना काय होती.....नालासोपारा पूर्वेकडील सेन्ट्रल पार्कमधील मुख्य रस्त्यावरील आयरिश सोसायटीच्या दुकान नं. ६ मध्ये युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेड या गोल्ड लोन देणाºया शाखेचे कार्यालय आहे. शुक्र वारी सकाळी चार चाकी गाडीतून सहा अनोळखी दरोडेखोर उतरले व नंतर त्यांनी तोंडाला मास्क लावून हातात हत्यारे घेऊन गोल्ड लोनच्या कार्यालयात प्रवेश करत कार्यालयात कामावर आलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांना दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून करोडचे सोने अवघ्या १२ मिनिटांमध्ये लुटून नेले.सहा वर्षे उलटूनही अॅक्सिस बँकेचा तपास शून्यनालासोपारा पश्चिमेकडील मुख्य रस्त्यावर बबली अपार्टमेंटमध्ये असलेल्या अॅक्सिस बँकेच्या कॅश व्हॅनवर २८ आॅगस्ट २०१३ रोजी दुपारी ३.१५ च्या दरम्यान दरोडा टाकून दरोडेखोरांनी ३ करोड ८७ लाख ५० हजार रु पये लंपास केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पण, या घटनेला सहा वर्षे उलटूनही तपास मात्र शून्य. इतकी मोठी कॅश व्हॅन दिवसाढवळ्या लुटली असतानाही आजपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही.इतकी मोठी लूट झाल्यावर पोलीस प्रशासनाने १२ टीम तयार केल्या होत्या. पोलिसांनी आरोपींचे स्केच सुद्धा बनवले होते. तसेच विविध ठिकाणावरील सीसीटीव्ही पोलिसांनी मिळवले होते, तरी या प्रकरणाचा उलगडा झाला नाही.
नालासोपाऱ्यातील दरोड्याच्या तपासासाठी जिल्ह्यातील पोलिसांची १० पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:56 PM