विक्रमगड : पाणीटंचाई निवारणार्थ तालुक्यात सुरू केलेल्या अनेक नळयोजनांचे सध्या बारा वाजले आहेत. या पाणीटंचाईग्रस्त गावपाडयांना नळ योजनेचा लाभ व्हावा यासाठी शासनाने लाखो रूपये खर्च करून टेटवाली, खांड, उपराळे, तलवाडा, कुंज अशा अनेक योजना तयार करण्यात आल्या परंतु त्यातील काही योजना या अर्धवट आहेत तर काही विज बिलाच्या थकबाकीमुळे बंद आहेत. परंतु त्यात भरडला जातो तो सर्वसामान्य माणूस त्याला कोसोदूर जाऊन पाणी आणावे लागते त्यामुळे गेली ३ ते ४ वर्षापासून अशा अनेक योजना या बंद आहेत. त्या कार्यान्वित व्हाव्यात यासाठी कोणीच प्रयत्न करीत नाही स्थानिकांनी अनेक वेळा मागणी केली परंतु लवकरच सुरू होईल असेच वेळमारू उत्तर पाणीपुरवठा विभागाकडून मिळत आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाली की हा प्रश्न ऐरणीवर येतो मात्र स्थानिक नेते व प्रशासकीय अधिकारी याकडे सोयस्करपणे दुर्लक्ष करतात व त्यामुळे त्या रखडल्या आहेत. त्या लवकर सुरू करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
तालुक्यातील अनेक नळयोजनांचे तीनतेरा
By admin | Published: January 23, 2017 5:13 AM