राहुल वाडेकर / विक्रमगडगेल्या अनेक वर्षांपासून अव्याहतपणे विक्रमगड व परिसराच्या कानाकोपऱ्यातून तीन हजार भाविक निवृत्तीनाथांच्या वारीसाठी त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघाले आहेत. निवृत्तीनाथाच्या दर्शनासाठी विक्रमगडकरही मागे राहीलेले नाहीत़. विक्रमगडमधून ३००० वारकरी १७ जानेवारीपासून वारीसाठी निघाले आहेत़ हे वारकरी विक्रमगड, साखरे, जव्हार, मोखाडा, मोरचुंडी व नंतर त्र्यंबकेश्वर येथे प्रस्थान करतात व तेथे आलेल्या संताच्या दिंडयांमध्ये सहभागी होेतात. विक्रमगडहून त्र्यंबकेश्वर-नाशिक निघालेल्या श्रीसंत निवृत्तीनाथ माउलींच्या दिंडयांनी त्र्यंबकेश्वर-नाशिक प्रवेश केला आहे़तर काही वाटेवरील वारकरी दिंडया आता अंतिम टप्प्यात आले आहे. एकनाथ, नामदेव, सोपान, मुक्ताबाई, निवृत्ती माऊली तुकाराम’ असा जयघोष करीत या दिंड्या जात असतात. दिंडीमध्ये भालदार, चोपदार, तुळशीधारी महिला, एकतारीधारक, वीणाधारक, घोडेवाला, पालखीवाले, किर्तनकार, भजनीबुवा, तंबोरेवाले असे अनेक रुपातले वारकरी असतात. अत्यंत शिस्तीने ते ही वारी पार पाडत असतात. तो त्यांच्या भक्तीजीवनाचा अविभाज्य भाग असतो.
विक्रमगडमधून तीन हजार भाविक त्र्यंबकच्या वारीला
By admin | Published: January 23, 2017 5:07 AM