शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

डहाणूत अन्न सुरक्षा योजनेचे तीनतेरा

By admin | Published: August 04, 2015 3:21 AM

डहाणू तालुक्यात गेल्या मे, जून, जुलै महिन्याचा अन्न सुरक्षा योजनेतून मिळणारा धान्यसाठा रास्तभाव दुकानदारांना मिळाला नाही. या प्रकारामुळे डोंगरकुशीत

डहाणू : डहाणू तालुक्यात गेल्या मे, जून, जुलै महिन्याचा अन्न सुरक्षा योजनेतून मिळणारा धान्यसाठा रास्तभाव दुकानदारांना मिळाला नाही. या प्रकारामुळे डोंगरकुशीत राहणाऱ्या हजारो आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी डहाणू रास्तभाव दुकानदारांच्या एका शिष्टमंडळाने डहाणू तहसीलदारांना केली आहे.साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या व सत्तर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या डहाणू तालुक्यात एकूण ७५ हजार रेशनकार्डधारक असून त्यात ४५ हजार कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहे. डहाणू तालुक्यात गेल्या चोवीस वर्षांपासून केंद्र शासनाने उद्योगबंदी लादल्यामुळे येथे कायमस्वरूपी रोजगार मिळत नाही. परिणामी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या स्वस्त तांदूळ, गहू, साखर, तेल, रॉकेल आदी वस्तूंचा येथील हजारो आदिवासी कुटुंबांना मोठा आधार असतो. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून येथील रास्तभाव दुकानदारांना धान्य मिळत नाही. मागील आघाडी सरकारने जानेवारी २०१४ पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा योजना सुरू केली. त्यानुसार अंत्योदय व दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका लाभार्थ्याला प्रति माह ३५ किलो धान्य तसेच प्राधान्य कुटुंबाला पाच किलो प्रति माह धान्य पुरविण्यात येत होते. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाने मोठ्या प्रमाणात धान्यसाठ्यात कपात केल्याने गोरगरिबांना प्रचंड महागाईत जीवन जगणे अत्यंत कठीण झाले आहेत. त्यातच गेल्या मे, जून, जुलैपासून बहुसंख्य धान्य दुकानदारांनी पैसे भरून धान्याचे परमिटदेखील मिळविले. परंतु, एफसीआय (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) मधून होणाऱ्या अपुऱ्या धान्य पुरवठ्याने दुकानदार व रेशनकार्डधारक त्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)