वसई : राज्य सरकाराच्या प्रसिद्धीमुळे व वाढत्या अपघातांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या वातानुकूलित शिवशाही बस च्या बाबतीत आणखी एक गंभीर प्रकार वसई डेपोत महाराष्ट्रदिनी सकाळी घडला.नादुरुस्त झालेल्या शिवशाही बस मधील पन्नासहून अधिक प्रवाशांनी वसई मॅनेजरला विनंती केल्यावर बºयाच वेळांनी एशियाड बसद्वारे हा प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बुधवारी सकाळी शिवशाही बसऐवजी एशियाड बससेवेतून पन्नासहून अधिक प्रवाशांना हा प्रवास करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी वसई आगारातून सकाळी ९ वाजता वसई-कात्रजमार्गे कोल्हापूरसाठी निघणारी शिवशाही ती नादुरु स्त झाली त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. परिणामी वसईच्या पारनाक्यावरून नियोजित वेळेत सकाळी ९ वाजता कोल्हपूरकडे जाणाºया शिवशाहीऐवजी एशियाड बस दिल्याने प्रवासी संतापात होते. त्यातच कुणाला तिकीट अथवा प्रवास करायचा नसेल किंवा कुणाला तिकिटांची रकम परत पाहिजे असेल त्यांनी ती घ्यावे असे हि फर्मान वसई एस टी डेपो ने काढले,त्यामुळे आधीच महिना अथवा पंधरा दिवसापूर्वी आरक्षित केलेली तिकिटे आता रद्द कशी करणार तर वेळीच कोल्हापूर ला पोहचले पाहिजे यासाठी एशियाडमधून जाणे पसंत केले असल्याचे प्रवाशांनी सांगितले. त्यातच रद्द झालेल्या शिवशाही बसच्या प्रवाशांना एशियाड बस तर दिली मात्र त्यामध्ये वाहक व चालकाने चक्क एस टी ची स्टेपनी सुद्धा प्रवाशांच्या जागेवर ठेवून ती वाहून नेल्याचे प्रवासी राजेश कर्डे यांनी सांगितले.शिवशाही बस अचानक नादुरु स्त झाली असेल तर आपण प्रवाशांसाठी पर्यायी सेवा देतो मात्र अशा तांत्रिक अडचणींबाबत आपण प्रवाशांकडे दिलगिरी व्यक्त करतो, तरीही पुढील महिन्यात आपण 900 शिवशाही बस आणतो आहोत आणि यापुढे अशा अडचणी येणार नाहीत, आपण हि सूचना आमच्यापर्यंत पोहचवली त्याबाबत म्हणून मी आपले व लोकमतचे आभार मानतो. यापुढे ही सेवा अधिक उत्तम करण्याचा आमचा प्रयत्न सुरू राहील, शेवटी ही सेवा प्रवाशांसाठी म्हणजेच जनतेसाठी आहे. तिने असा फिडबॅक आमच्यापर्यंत जरूर पोहचवावा.- दिवाकर रावते,परिवहन मंत्री ,महाराष्ट्र राज्यआम्ही महिनाभर आधी २७ तिकिटे आरामदायी व वातानुकूलित प्रवासासाठी आरक्षित केली होती, मात्र अचानक बुधवारी सकाळी शिवशाही एसटी रद्द झाल्याचे सांगितले अनेकदा विनंती केल्यावर आम्हाला नॉन एसी एशियाड बस सेवा देण्यात आली, आणि हि बस दीड तास उशिराने सुटली , एस टी ने शिवशाहीच्या बदल्यात शिवशाही देणे बंधनकारक होते. जेणेकरून आमचा प्रवास सुखकर होईल अन्यथा या शिवशाही बससेवाचा काय उपयोग आहे, आमची चूक नसतांना एस टी डेपोच्या अधिकाऱ्यांकडून उलट उत्तरे एकून घेणे हे उचित नाही यावर ठोस कारवाई होणे अपेक्षित आहे. दोन्ही बसच्या तिकिटाच्या दरात जो फरक आहे तोही आम्हाला एसटीने देणे आवश्यक होते.- राजेश कर्डे, शिवशाही प्रवासी, वसई भास्कर आळीवसईत केवळ 4 शिवशाही बस आहेत.? पर्यायी सेवा नाहीवसईत शिवशाही वातानुकूलित केवळ ४ बसेस असून त्याचे वर्कशॉप नालासोपाº्यात असून शिवशाही बस नादुरु स्त झाल्यावर त्यासाठी पर्यायी व अतिरिक्त बस पुरवता येत नाही त्यामुळे तांत्रिक अडचण अचानक निर्माण झाल्यावर केवळ शिवशाही ऐवजी एशियाड बससेवा देणे अथवा प्रवाशांना त्यांचे तिकीट रद्द करून रक्कम परत करणे हेच केवळ आमच्या हातात आहे. शिवशाही बसचे स्वरूप वेगळे आहे. तसेच त्यांची या डेपोतील संख्याही अत्यंत मर्यादीत आहे त्यामुळे स्टँडबाय अशा शिवशाही बसेस या डेपोत नाहीत. परिणामी आम्हाला शिवशाहीत बिघाड झाल्यास व तो लवकर दुरूस्त होणारा नसल्यास ती बस रद्द करावी लागते.- हेमंत जाधव, डेपो प्रभारी
तिकिट शिवशाहीचे, प्रवास एशियाडचा, वसई डेपोतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 12:28 AM