- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : जीएसटी परिषदेने मातीच्या मूर्तीवर कुठलाही कर न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या वर्षी त्याचा प्रत्यक्ष लाभ गणेशभक्तांना होणार नसल्याचे बाजारातील परिस्थितून जाणवते आहे.येत्या १३ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. या करीता सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणेश मूर्तींची आॅर्डर दीड-दोन महिन्यांपासून किमतीच्या पन्नास टक्के रक्कम भरून नोंदविण्यास प्रारंभ झाला आहे. शिवाय सर्वच गणेशमूर्ती आकाराला आल्या असून फक्त रंगरंगोटी व कलाकुसरीचे काम बाकी आहे. येथील मूर्तीशाळेत सहा महिन्यापूर्वीच गुजरातच्या भावनगर येथून शाडू माती, तर नारळाचा काथ्या आणि इकोफ्रेंडली रंग मुंबईच्या बाजारातून आणण्यात आले. आहेत. त्याच्या खरेदीवर जीएसटी लावण्यात आला आहे. तथापि एकूण उत्पादन खर्चाचा अंतर्भाव करून मूर्तीची किंमत ठरविण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना जीएसटीचा अधिभार सोसावाच लागणार आहे. तसे न केल्यास मूर्तीकारांना त्याचा फटका सोसावा लागेल, असे मूर्तीकारांचे म्हणणे आहे. गुजरातच्या बलसाड, नवसारी, वापी, खतलवाड, उंबरगाव, सिल्व्हासा आणि दमण या भागातून हजारो गणेशमूर्ती निर्यात केल्या जातात. तयार होणाऱ्या एकूण उत्पादनापैकी नव्वद टक्के मूर्तींची विक्री या भागात होत असून उर्वरित अन्य पालघर जिल्ह्यात होते. त्यांची अर्धी किंमत घेऊन बुकिंग झाले आहे.‘‘मूर्ती तयार करण्यासाठी लागणाºया वस्तू जीएसटी मोजून खरेदी केल्या आहेत. व शासनाने दोन दिवसांपूर्वी निर्णय दिला असल्याने त्याची अंमलबजावणी शक्य नाही. त्यामुळे मोठा फटका सोसावा लागेल.-महेश फाटक (मूर्तीकार डहाणू)
यंदा जीएसटीमुक्त गणेशमूर्ती अशक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 2:42 AM