शौकत शेखडहाणू: समाजातील दीनदुबळे, अंपंग, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती, जामाती इतर मागासवर्गीय जाती या ंबरोबरच वयोवृध्द, निराधार, अपंग, अविवाहित, घटस्फोटीत, क्षयरोगी, विधवा, तसेच काम करण्याची क्षमता नसलेले इ. व्यक्तींना शासनाच्या पुरवठा विभागामार्फत अन्न्पूर्ण योजनेअंतर्गत दरमहा दहा किलो धान्य दिले जात होते. परंतु डहाणूच्या पुरवठा विभागाला गेल्या वर्षभरापासून अन्नपूर्ण हेड खाली शासनाकडून धान्यच उपलब्ध होत नसल्याने हजारो निराधारांना भीक मागण्याची वेळ आली आहे.पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभिर्याने लक्ष देवून तात्काळ धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार, इंदीरागांधी वृध्दपकाळ, श्रावणबाळ तसेच राष्टÑीय कुटुंब सहाय्य केले जाते परंतु या योजनेत पात्र होण्यासाठी मोठया प्रमाणात कागदपत्रे, तसेच अटी, शर्ती असल्याने हजारो निराधारांना त्याचा लाभ मिळत नाही.विशेष म्हणजे साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या व आदिवासी बहुल असलेल्या डहाणू तालुक्यामध्ये डोंगरकुशीत राहणाºया हजारो आदिवासी कुटुंबांकडे आजही रेशनकार्ड, आधारकार्ड नसल्याने त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही.दरम्यान, शासनाच्या पूरवठाविभागाच्या मार्फत समाजातील अंध, अपंग निराधार, तसेच काम करण्याची क्षमता नसलेल्या लाभार्थ्यांना दर महा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दहा किलो तांदुळ मोफत दिले जात होते. परंतु गेल्या वर्षभरापासून डहाणूच्या पुरवठा विभागात शासनामार्फत दिले जाणारे धान्य उपलब्ध होत नसल्याने येथील हजारो निराधारांवर उपासमारीची वेळ आली असून समाजातील हे वृध्द, अपंग लाभार्थी डहाणूच्या महालक्ष्मी तसेच अशागड येथील संतोषी मातेच्या मंदिरात भीख मागत असतात.
अन्नपूर्णा योजनेअभावी लाभार्थ्यांवर भिक्षांदेहीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 3:03 AM