वाडा : आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने बुधवारी वाडा येथील खंडेश्वरी नाक्यावर रास्ता रोको व त्यानंतर जेलभरो करण्याचा इशारा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.अंगणवाडी कर्मचा-यांना किमान दहा हजार रु पये व सेवा ज्येष्ठतेनुसार मानधन देण्यात यावे, लाभार्थीच्या आहाराच्या रकमेमध्ये तिपटीने वाढ करावी, टी. एच. आर पध्दत बंद करून लाभार्थीना पर्यायी आहार देण्यात यावा, जून ते आॅगस्ट महिन्याच्या मानधनाची रक्कम तत्काळ देण्यात यावी, फेब्रुवारी २०१७ पासून थकीत असलेल्या लाभार्थाना आहाराची रक्कम द्यावी, योजनेच्या कामासाठी लागणारे छापील रजिस्टर व अहवाल फॉर्म उपलब्ध करून देण्यात यावे, अमृत आहार योजनेत खर्च झालेले पैसे द्यावेत या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अंगणवाडी कर्मचा-यांचा आज जेलभरो, रास्तारोको; सर्वत्र असणार बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:13 AM