विक्रमगड : केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी, शेतमजूर, कामगार, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक व महिला विरोधी तसेच धर्मांध, जातपातवादी व फूटपाडया धोरणांच्या विरोधात देशातील सर्व श्रमिक जनतेने २ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप पुकारलेला आहे़ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा या देशव्यापी संपाला जाहिर पाठिंबा आहे़ उद्या ठाणे-पालघर जिल्हयांतील प्रत्येक तालुक्यात हजारोच्या संख्येने रास्तारोको आंदोलन करुन भाजपाच्या मोदी व फडवणीस सरकारला सणसणीत तडाखा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे़ कामगार, शेतकरी, आदीवासी, बेरोजगार यांच्या हिताच्या अनेक मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे. (वार्ताहर)
आज डाव्यांचा देशव्यापी संप
By admin | Published: September 02, 2016 3:37 AM