पालघर : विनाशकारी वाढवण बंदराला विरोध आणि इतर मागण्यासाठी ११ डिसेंबरला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा धडकणार असल्याची माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस नरेंद्र पाटील आणि वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. शुक्रवार ११ डिसेंबर २०१५ ला दुपारी २ वाजता मुंबई पासून ते गुजरात पर्यंतच्या संपूर्ण किनारपट्टी वरील मोर्चात मच्छिमार, शेतकरी, बागातदार आणि डाईमेकर्स सामील होणार आहेत. पर्यावरण दृष्ट्या अति संवेदनशिल असणाऱ्या वाढवणच्या समुद्रात जवाहारलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मार्फत महाकाय वाढवण बंदर तसेच बोईसर येथे जिंदाल कंपनी बांधत असलेल्या बंदरामुळे येथील मच्छिमार शेतकरी, बागातदार, डाईमेकर्स, उद्धयोजक उद्वस्त होणार आहेत. असेच १९९७-९८ मध्ये तत्कालीन युती सरकार डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाच्या निर्णयाच्या फटकाऱ्याने रद्द करणे भाग पडले होते. पुन्हा राष्ट्रीय आघाडी सरकार सत्तेवर येताच पुन्हा हेच वाढवण बंदर आम्ही रद्द केले नव्हते तर स्थगित केले होते. या शब्दांचा खेळ करून जुन्याच परवानगी वर आधारित बाधण्याचा घाट घातला आहे तसेच बोईसर येथील जिंदाल जेटीची मन सुनावणी होवूनही जनतेच्या विरोधाला न जुमानता बाधण्याच्या कारवाया सुरू केलेल्या आहेत सरकारच्या या कारवाया हाणून पाढण्यासाठी आणि ही दोन्ही बंदरे तत्काळ रद्द करण्याच्या दृष्टीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा विरोध मोर्चा आयोजित करण्याचे सांगण्यात आले या दिवशी सर्व मच्छिमार्केट मच्छिबाजार, मच्छीविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मच्छिमारांचा धडक मोर्चा
By admin | Published: December 11, 2015 1:07 AM