पालघर: बुधवार पासून आदिशक्तीचे आगमन होत असून जिल्ह्यात ८३८ सार्वजनिक दुर्गामाता मंडळाचे आॅनलाइन अर्ज आले असून त्यातील ७७३ सार्वजनिक आणि २४ खाजगी ठिकाणी मुर्ती स्थापना होणार आहे. देवीच्या आगमनाची व स्थापनेची तयारी पूर्ण झाली असून हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.नुकत्याच शांततेत पार पडलेल्या गणेशोत्सवानंतर पालघर जिल्हावासीयांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले होते. हा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळे मोठ्या उत्साहाने कामाला लागली आहेत. हा स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जात असल्याने तो पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी महिलांची मोठी धावपळ सुरू आहे. नऊ दिवस चालणाºया या उत्सवामध्ये गरबा, दांडिया खेळण्यासाठी तरुण-तरुणी वेगवेगळ्या पोषाखाची खरेदी करून सज्ज झाली असून गरब्याच्या नवनवीन स्टेप्स शिकण्यासाठी कोर्स ही पूर्ण करण्यात आल्याचे विणाली नाईक यांनी लोकमतला सांगितले.बाजारात हार, फुले, धूप, अगरबत्ती आदी पूजा साहित्याच्या खरेदीसाठी तर घट स्थापनेसाठी लागणाºया रंगीबेरंगी घट, देवीचे मुखवटे यांची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे ८३८ सार्वजनिक दुर्गामाता मंडळाचे अर्ज नोंदणी करीत प्राप्त झाले असून ७७३ सार्वजनिक व अन्य रूपात २४ दुर्गादेवीची स्थापना होणार आहे. तसेच २० ठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रमही साजरे केले जाणार आहेत. हा नवरात्रोत्सवाचा सण शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण आणि विजयकांत सागर ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, ११४ पोलीस अधिकारी, १ हजार ४६० पोलीस कर्मचारी,एक एस आरपी कंपनी, २५० होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी राखीव पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी २४ तास पोलीस बंदोबस्त सज्ज राहणार आहे. रेकॉर्ड वरील गुन्हेगार आणि अवैध धंद्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली असून संशयास्पद बाबीची माहिती नागरिकांनी पोलिसांना अथवा नियंत्रण कक्षाला द्यावी असे आवाहन केले आहे.आवाज आणि कालावधीच्या बंधनाने तरुणाई झाली नाराजनवरात्रोत्सव व मिरवणूकीमध्ये डिजे वरील बंदी कायम असल्याने आयोजकांना गरबा डान्स स्पर्धा वेळेच्या आत आवराव्या लागणार आहेत. त्यामुळे गरबा प्रेमीत नाराजी आहे. किती व कोणत्या दिवशी गरब्याचा कालावधी वाढेल हे ही अद्याप जाहिर व्हायचे आहे.तरुणाईने तºहेतºहेचे पोषाख आणि दांडिया खरेदी केल्या असल्यातरी १० च्या आतच दांडिया संपवायचा असल्याने व त्याचा आवाजही हळू ठेवावा लागणार असल्याने तिच्यामध्ये नाराजी आहे. याचा परिणाम गरब्याला मिळणाºया प्रतिसादावर होणार आहे.आवाज आणि खेळण्याच्या वेळेवर लादलेली बंधने यामुळे यंदा गरब्याला मिळणाºया प्रायोजकांमध्ये मोठी घट झाली आहे. ही घट संख्या आणि प्रायोजकत्वाची रक्कम अशा दोनही रुपात झाली आहे. आगामी वर्ष निवडणूकीचे असल्याने गतवर्षीपेक्षा यंदा स्थिती बरी आहे.
आज नवरात्रोत्सवाची धूम; गरब्याला मिळणाऱ्या प्रतिसादावर होणार विपरीत परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 11:38 PM