- आशिष राणे
वसई- वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत १२ विविध सेवा देणाऱ्या कर्मचारी आणि नागरिक म्हणून लाभार्थ्यांना दि.१६ जाने २०२१ ते दि.१७ ऑक्टोबर २०२१ रोजी पर्यंतच्या कालावधीत एकूण १२ लाख ५९ हजार ९६५ इतकं लसीकरण वाटप झाल्याची माहिती वसई विरार महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीनं लोकमत ला दिली.
याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले की, वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात लसीकरण विविध ठिकाणी सुरू आहे जसा शासनाकडून लसीचा साठा येतो तो अभ्यासपूर्ण शहरातील विविध लसीकरण केंद्र निहाय पाठवला जातो . दरम्यान दि.१६ जानेवारी २०२१ ते दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पर्यंत आजवर वसई विरार शहरांतील विविध लसीकरण केंद्रावर शहरांतील १२ विविध प्रकारच्या सेवार्थ लाभार्थ्यांना एकूण १२ लाख ५९ हजार ९६५ इतके ( डोस ) कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाने प्रसिध्द केलेल्या या आकडेवारीत १२ विविध सेवा बजावणारे लाभार्थी यांचा समावेश आहे. तो खालीलप्रमाणे,
लाभार्थी लसीकरण संख्या
हेल्थकेअर वर्कर (पहिला डोस ) १३४८८हेल्थकेअर वर्कर (दुसरा डोस) १२४८६फ्रंटलाइन वर्कर (पहिला डोस ) १४४८६फ्रंट लाईन वर्कर (दुसरा डोस ) १२५२९
१८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती (पहिला डोस)४५६९३२
१८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती (दुसरा डोस)
४५ ते ५९ वयोगटातील व्यक्ती (पहिला डोस)२३४९४४
४५ ते ५९ वयोगटातील व्यक्ती (दुसरा डोस)१३२८२९
६० वर्षावरील व्यक्ती (पहिला डोस )
६० वर्षावरील व्यक्ती ( दुसरा डोस )
८५४०५गरोदर महिला (पहिला डोस )१९६२गरोदर महिला (दुसरा डोस )२२२
एकूण डोस वाटप :- १२,५९,९६५
अशी आकडेवारी वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाने प्रसिद्ध केल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.