आशिष राणे, वसई
वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत १२ विविध सेवा देणाऱ्या कर्मचारी आणि नागरिक म्हणून लाभार्थ्यांना दि.१६ जाने २०२१ ते दि.२ जानेवारी २०२२ रोजी पर्यंतच्या कालावधीत एकूण २० लाख ८६ हजार ३४० इतकं लसीकरण वाटप झाल्याची माहिती वसई विरार महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीनं 'लोकमत'ला दिली.
याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले की, वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात लसीकरण विविध ठिकाणी सुरू आहे जसा शासनाकडून लसीचा साठा येतो तो अभ्यासपूर्ण शहरातील विविध लसीकरण केंद्र निहाय पाठवला जातो .दरम्यान दि.१६ जानेवारी २०२१ ते दि. २ जानेवारी २०२२ रोजी पर्यंत आजवर वसई विरार शहरांतील विविध लसीकरण केंद्रावर शहरांतील १२ विविध प्रकारच्या सेवार्थ लाभार्थ्यांना एकूण २० लाख ८६ हजार ३४० इतके ( डोस ) कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.
वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाने प्रसिध्द केलेल्या या आकडेवारीत १२ विविध सेवा बजावणारे लाभार्थी यांचा समावेश आहे. तो खालीलप्रमाणे,
हेल्थकेअर वर्कर (पहिला डोस ) : १३४९१हेल्थकेअर वर्कर (दुसरा डोस) : १२५९६फ्रंटलाइन वर्कर (पहिला डोस ) : १४४८६फ्रंट लाईन वर्कर (दुसरा डोस ) : १३५०२१८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती (पहिला डोस) : ५७४४८११८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती (दुसरा डोस): ५२१५४९४५ ते ५९ वयोगटातील व्यक्ती (पहिला डोस) : ३९३४४९४५ ते ५९ वयोगटातील व्यक्ती (दुसरा डोस): २४३७५८६० वर्षावरील व्यक्ती (पहिला डोस ) : १६४०६१६० वर्षावरील व्यक्ती ( दुसरा डोस ) : १३१४३७गरोदर महिला (पहिला डोस ): २९३०गरोदर महिला (दुसरा डोस ) : ६००