पालघर : जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई या सहा मतदारसंघांमध्ये एकूण ५३ उमेदवार रिंगणात असून बोईसरमध्ये तिरंगी तर अन्य पाच मतदार संघात दुरंगी लढती रंगणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण १६ उमेदवारांनी माघार घेतली आहे.डहाणू विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून पास्कल धनारे, माकपाकडून विनोद निकोले यांनी अर्ज दाखल केला आहे. दहा उमेदवार रिंगणात असले तरी इथे दुरंगी लढत रंगणार आहे.विक्रमगड मतदारसंघांमध्ये एकूण दहा उमेदवार रिंगणात आहेत. येथे शिवसेना - भाजप युतीचे डॉक्टर हेमंत सवरा आणि राष्ट्रवादी महाआघाडीचे सुनील भुसारा यांच्यात दुहेरी लढत रंगणार आहे.पालघर विधानसभेत सर्वात कमी म्हणजे पाच उमेदवार रिंगणात असून शिवसेना-भाजप महायुतीचे श्रीनिवास वनगा आणि काँग्रेस महाआघाडीचे योगेश नम यांच्या दुरंगी लढत रंगणार आहे.बोईसर विधानसभा मतदार संघात एकूण आठ उमेदवार रिंगणात असून येथे शिवसेना-भाजप महायुतीचे विलास तरे, बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील तर भाजप मधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार संतोष जनाठे यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे.नालासोपारा मतदारसंघातून सर्वाधिक १४ उमेदवार रिंगणात असून शिवसेना-भाजप महायुतीचे प्रदीप शर्मा तर विद्यमान आ. असलेले बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.वसई विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आ. हितेंद्र ठाकूर यांची लढत काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या विजय पाटील यांच्याशी होणार आहे. अन्य प्रमुख उमेदवारांमध्ये मनसेचे प्रफुल्ल ठाकूर यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात ६ मतदारसंघांत एकूण ५३ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 11:38 PM