पालघर : पालघर जिल्ह्याला पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत किनारपट्टीवरील केळवे सह अन्य विविध गावांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्याला सन २०१५ पासून २३० कोटी ३ लाख ८२ हजाराचा वितरित झालेला निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तारापूर औद्योगिक वसाहती मधून क्षमतेपेक्षा अधिक प्रदूषित पाणी सोडण्यात येत असल्याने किनाº्यालगतचे पाणी काळे-पिवळे झाले असून दुसरीकडे थेट समुद्रात ७.१ किमी अंतरावर पाईपलाईन द्वारे प्रदूषित पाणी सोडले जाणार असल्याने समुद्रकिनारे दुर्गंधीयुक्त, प्रदूषित होऊन पर्यटकांची संख्या रोडवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तारापूर औद्योगिक वसाहती मध्ये सुमारे ३ ते ४ हजार लहान, मोठे कारखाने असून ह्या कारखान्यातून निघणारे प्रदूषित रासायनिक पाण्यावर प्रक्रि या करण्यासाठी २५ एमएलडी क्षमतेचे शुद्धीकरण प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले होते. मात्र कारखान्याच्या वाढत्या संख्येने या शुद्धीकरण प्रक्रि येची क्षमता मर्यादित ठरल्याने ५० एमएलडी क्षमतेच्या नवीन शुद्धीकरण प्रक्रियेची उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. ही पाईपलाईन समुद्रात ७.१ किलोमीटर्स आत जाणार असल्याने प्रदूषणाची मात्रा वाढणार आहे. पूर्वी ही लाईन समुद्रकिनाऱ्यापर्यंत मर्यादित असताना मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी सोडले जात असल्याने आणि मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत असल्याचे स्थानिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिले होते.मग जर ही लाईन समुद्रात खोलवर सोडली तर प्रदूषणाची मात्रा वाढून सातपाटी, मुरबे, नवापूर, उच्छेळी-दांडी, डहाणू या भागाच्या समोरील लहान बोटीद्वारे केली जाणारी मासेमारी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे किनारपट्टीवरील खाडीतील बोय, शिंगटी, शिंपले आदी माशांना रॉकेलमिश्रीत वास येत असल्याने माश्यांची विक्र ी होत नाही. त्याचप्रमाणे शेवंड, पापलेट,कोत, दाढा,घोळ आदी माश्यांनाही भविष्यात रॉकेल मिश्रित रसायनाचा वास येण्याची शक्यता आहे. प्रदूषणामुळे इथला निसर्ग उध्वस्त होत नामशेष होण्याच्या दिशेने मार्गक्र मण सुरू असल्याचे सांगून कोकण वाचिवण्याच्या आमच्या आंदोलनात प्रदूषणाविरोधात ही आमची लढाई राहणार असल्याचे लोकमतला सांगितले.- संजय यादवराव, अध्यक्ष, समृद्ध कोकण संघटना५० इमएलडी क्षमतेच्या पाईपलाईनचे काम अपूर्णावस्थेत असल्याने दररोज २ पैसे प्रति लिटर असे दररोज ५ लाख रु पये दंड म्हणून विभागीय कोकण आयुक्तांकडे भरण्याची नोटीस बजावली आहे. मात्र पैसे अजूनही जमा केलेले नाहीत.- मनीष होळकर, उपप्रादेशिक अधिकारीकरोडोंचा निधी झाला खर्च, अनेक कामे सुरूजिल्हा पर्यटन विकास कार्यक्र मांतर्गत सन २०१५-१६ साठी जिल्हास्तरीय पर्यटन विकास कार्यक्र मा अंतर्गत वन पर्यटन, प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत १३८ कोटी ८ लाख १९ हजाराच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळून ९० कोटी ५ लाख १८ हजाराच्या निधीतून ८९ कामे मंजूर करण्यात आली आहे.२०१६-१७ साला करिता १२९ कोटी २ लाख २३ हजाराच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळून ८० कोटी १लाख ३३ हजाराच्या निधीतून ६१ कामे मंजूर करण्यात आली असून ११ कामे पूर्ण झाली असून ५० प्रगतीपथावर आहेत.सन २०१७-१८ साला करिता ११४ कोटी ७ लाख ३२ हजाराच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळून ५९ कोटी ७ लाख ३१ हजाराच्या निधीतून ३१ कामांना मंजुरी मिळाली पण एकही काम पूर्ण झाले नसून ३१ अशी सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.सन २०१५ ते २०१८ सालात एकूण ३८२ कोटी ७ लाख ४७ हजाराच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळून २३० कोटी ३ लाख ८२ हजारा च्या निधीतून १८१ कामांना मंजुरी मिळाली असून ८४ कामे पूर्ण होत ३१ कामे प्रगतीपथावर असून पर्यटनाला मोठा वाव देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील पर्यटन धोक्यात, २३० कोटींचा खर्च वाया ? : प्रदूषणामुळे बंहुसंख्य बीचेस झाले काळे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 1:35 AM