विक्रमगड : रिमझिम पडणाºया पावसाने तालुक्यातील ग्रामिणभाग, डोंगर दºया हिरवागार करुन टाकला असून ही वनराई शालू निसर्गप्रमींना जणू साद घालत आहेत. मिनी महाबळेश्वर म्हणून संबोधिलेले जव्हार घाट, विक्रमगडची हिरवीगार वनराई या ठिकाणी आवर्जून भेट देतात़ पण हे दृश्य अधिक लोभसवाने दिसते ते रिमझिम पावसात. सध्या ज़व्हारचा दाभोसा व विक्रमगडचा पलुचा धबधब्यावर तरुणाईची तुफान गर्दी पहायला मिळत आहे. शनिवार, रविवार तर येथे गर्दीचा उच्चांक असतो. त्यामुळे येथील आदिवासींना रोजगारही उपलब्ध होत आहे.पावसाळा सुरु झाला म्हणजे जव्हार-विक्रमगडच्या निसर्ग-सौदर्याने आपले रंग उधळायला सुरुवात केली आहे़.डोंगर कपारीमधुन झुळझुळवाहणारे लहान-लहान झरे, दाट धुके तर कधी शुभ्र वातारणाचे मनमोहक दृश्य या सर्व सृष्टी सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक या भागाकडे आकर्षित होतात़ मुंंबई, नाशिकपासून अवघ्या १०० ते १२५ कि़ मी़ अंतरावर असलेले विक्रमगड, जव्हार मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते़ठाणे, मुंबई, नाशिक, कल्याण येथून मोठ्याप्रमाणात तरुणाईचे तांडे येथील धबधब्यावर दररोजच हजेरी लावित असून आदिवासी भागातील तरुण व महिला त्यांना भाजलेला मक्का, काकड्या व रानमेव्याची विक्रीकरुन खुष क रीत आहे. या द्वारे येथील स्थानिकांना रोजगार जरी मिळत असला तरी शहरी तरुणाईला गावरान चिजा खायला मिळत असल्याने ते ही मोठ्या आनंदाने त्या खरेदी करुन आपल्या मित्र मंडळी व कुटुंबियांसाठी घेऊन जात आहेत.
पर्यटकांना विक्रमगडचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:54 AM