शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 3:50 AM

ट्रॅफिक जॅमचा प्रश्न दिवसेंदिवस जटीलच; वाहनचालक,पादचारीही झाले त्रस्त

विरार : वसईमध्ये रहदारीच्या ठिकाणी मोठमोठे ट्रान्सफॉर्मर रस्त्यावर उघडे पडलेले असल्याने आणि विजेचे खांब देखील अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी उभारल्याने वाहतूककोंडी होत असून चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.वाढती लोकसंख्या व अरुंद रस्ते यामुळे वसईत वाहूककोंडी होतच होती. मात्र आता रस्त्यावर असणाऱ्या या ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांमुळे ती अधिकच वाढली आहे. नागरिकांसोबत वाहतूक पोलीस देखील या उघड्या ट्रान्सफॉर्मरला कंटाळले आहेत. हा प्रश्न दिवसेंदिवस जटील होतो ेआहे.या तालुक्यातील रस्त्यांवर नागरीकांची व दुकानांचीच वर्दळ तर आहेच आता त्यात ट्रान्सफॉर्मरची देखील भर पडली असून वाहतुुकीस अडथळा निर्माण होता आहे. तर अनेकदा रस्त्यावरून चालणाºया नागरिकांच्या अंगावर या ट्रान्सफॉर्मर मधील गरम आॅईल अंगावर पडले आहे , असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. ज्या वेळी येथे नगरपरिषद होती तेव्हा येथील रस्त्ये हे कच्चे होते. त्यानंतर आता नगरपरिषदेची महानगरपालिका झाली, रस्ते सुधारले मात्र या ठिकाणी असणारे ट्रान्सफॉर्मर होते त्याच जागी तसेच आहेत, असे शिवसेनेचे माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांचे म्हणणे आहे. हा प्रश्न कधी सुटतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.वसई तालुक्यातील रस्त्यांवर कुठे कुठे आहेत ट्रान्सफॉर्मर...नायगाव पूर्वेतील जूचन्द्र, परेरा नगर, नायगाव पश्चिममधील उमेळमान, पापडी, कोळीवाडा, स्टेला, बभोला, दिवाणमान, आनन्द नगर, अंबाडी, माणिकपूर, सनसिटी, वसई पूर्वेकडील वालीव, सातीवली, धुमालनगर तर नालासोपारा पूर्व असणाºया अलकापुरी, आचोले रोड, एव्हरशाइन, शिर्डी नगर, गालानगर , तुळींज रोड, विजय नगर, मोरेगांव, नागिनदास पाडा, ओसवाल नगरी, प्रगतीनगर तर पश्चिम कडील सोपारा गांव, समेळपाडा, हनुमान नगर, श्रीप्रस्थ, पाटणकर पार्क तसेच विरार पश्चिमेला असणारे अर्नाळा, आगाशी, बोळींज, विराटनगर, पूर्व कडील चंदनसार, मनवेलपाडा, कारगीलनगर ह्या भागात ट्रान्सफॉर्मर रस्त्याच्या मध्ये उघडे पडले आहे. पावसाच्या वेळी ह्या ट्रान्सफॉर्मर मध्ये पाणी जाऊन ह्यातील करंट पाण्यात उतरतो व धोका अधिक वाढतो. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे या अशा ट्रान्सफॉर्मर मधील पाण्याच्या करंट ने तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जर ट्रान्सफॉर्मर बदलू शकत नसाल तर किमान त्याच्या बाजूला सुरक्षा भिंत तरी बांधावी असी मागणी नागरिकांनी केली आहे.महापालिकेने महावितरणशी अनेकदा पत्रव्यवहार केला होता. मात्र हे ट्रान्सफॉर्मर आहे त्या जागेवरून दुसºया जागेवर हलवण्यासाठी आमचे तेवढे बजेट नसल्याचे महावितरणने सांगितले.- अमोल जाधव(वीज अभियंता-विरार वसई महानगरपालिका)ट्रान्सफार्मरची जागा बदलण्याचा प्रस्ताव आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाºयांपुढे मांडला असून त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध झाल्यावर हे रस्त्यावर असणारे ट्रान्सफार्मर बदलले जातील. निधी मंजूरीशिवाय याबाबत काही करणे अशक्य आहे.- सूर्यकांत महाजन(मुख्य अभियंता-महावितरण, वसई)

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूकVasai Virarवसई विरार