बोईसर : शनिवारी पहाटे पासून मुसळधार पावसामुळे बेटेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील टाटा हाऊसिंग कॉलनी समोरील रस्त्यावर प्रचंड पाणी साठल्याने बोईसर ते महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.महिना भराच्या विश्रांतीनंतर शनिवारी मुसळधार पावसाने प्रदीर्घ ठिय्या दिल्याने या रस्त्यावर तीन फूट पाणी जोरदार गतीने वाहत होते. हा रस्ता राष्टÑीय महामार्गाला जोडला जात असल्याने अनेक वाहने बंद पडली होती. त्यात वाहतुककोंडीची भर पडली होती. त्या वाहणाºया पाण्यातून मोटरसायकल व छोटी मोठी तसेच अवजड वाहन चालक धोका पत्करून वाहने दामटीत होते. परिसरातिल गांव पाड्यातील नागरिकांनाही या स्थितीचा सामना करावा लागला. पादचाºयांचेही प्रचंड हाल झाले.हा रस्ता एमआयडीसी च्या अखत्यारीत असून त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था बरोबरच उंच पूल बांधणे गरजेचे आहे तसेच नागरी वसाहती ना परवांनग्या देतांना नियोजन करायला पाहिजे-संजोग घरत, उपसरपंच,बेटेगाव, ग्रामपंचायत
मुसळधार पावसामुळे बोईसरला वाहतूक ठप्प, नागरिकांची उडाली तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 3:22 AM