- सुरेश काटे
तलासरी : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांच्या सीमेलगत असलेल्या मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर दापचरी तपासणी नाक्यावर गुजरात वरु न मुंबईच्या दिशेने जाताना वारंवार मोठी वाहतूक कोंडी होत आहे. येथे होणारी वाहन तपासणी, वजन तसेच कायवाई करण्याच्या सदोष पद्धतीमुळे शेकडो वाहनांना नाहक ताटकळत राहवे लागते. आरटीओ व तपासणी ठेकेदारांच्या टाईमपास कार्यपद्धतीमुळे येथे दररोज सहा ते सात किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होत आहे.हा तपासणी नाका अद्यावत असून देखील येथील आर.टी.ओ. अधिकारी तपासणीसाठी अतिरिक्त वेळ घेत असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या तपासणी नाक्यावर वाहनांसाठी एकूण दहा लेन असून त्यापैकी दोन लेन छोट्या गाड्यांसाठी आहेत तर इतर आठ लेन मोठ्या गाड्यांसाठी आहेत. तरी देखील या ठिकाणी वाहनांच्या सात ते आठ किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या असतात.वाहतूक कोंडीच्या परिस्थितीत छोट्या गाड्यांचे चालक मात्र आपली गाडी विरु द्ध बाजूने चालवित असल्याने एखादा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे.याबाबत आरटीओ अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रि या देण्यास नकार दिला. तसेच स्वत:ची नेम प्लेट खिशात लपवली. हा बेदरकारपणा दररोज सुरु असतो.सदोष धोरण आणि लालफितीचा कारभारतपासणी नाक्यावर दररोज हजारोच्या संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. या गाड्यांचे कागदपत्र तपासणी व त्यांचे वजन करण्याचे काम केले जाते.या कामाचा ठेका सदभाव नामक कंपनीकडे असून वाहन दोषी आढळणाºया त्यावर कारवाई करण्याचे काम आरटीओ कार्यालयामार्फत केले जाते.