वाडा : वाडा - भिवंडी महामार्गावरील कंपन्यांसाठी कच्चा आणि पक्का माल घेऊन येणारी अवजड वाहने ही रस्त्यावरच उभी करण्यात येतात. यामुळे येथे वाहतूक कोंडी आणि अपघात होत असल्याच्या तक्रारी येथील नागरिक करीत आहेत. ही अवजड वाहने कंपनीच्या आवारात उभी करण्यात यावीत, अशी त्यांची मागणी आहे.तालुक्यात औद्योगिकीकरण वाढल्याने येथे कारखाने वाढले आहेत. या कारखान्यात कच्चा तसेच पक्का माल घेऊन येणारी आणि जाणारी अवघड वाहने येत असतात. ही वाहने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरच महामार्गावर लावली जातात. त्यामुळे अन्य वाहनांना समोरून येणारी वाहने दिसत नाहीत, आणि अनेकदा किरकोळ अपघात होतात. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. एखादा मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन पाहते आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.नागरिकांची समस्या आमच्यापर्यंत पोहोचली असून यासंदर्भात पोलिसांशी पत्रव्यवहार करण्यात येईल.- प्रकाश पातकर, उपअभियंतासार्वजनिक बांधकाम विभाग वाडा
कंपन्यांच्या वाहनामुळे ट्रॅफिक जॅम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:46 PM