शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

पालघर जि.प.च्या १०३ शिक्षकांच्या ठाण्यामध्ये बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 11:49 PM

पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे जानेवारीत बदली झालेल्या सुमारे १०३ प्राथमिक शिक्षकांची नेमणुक ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केली नव्हती.

ठाणे  - पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे जानेवारीत बदली झालेल्या सुमारे १०३ प्राथमिक शिक्षकांची नेमणुक ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केली नव्हती. मात्र, रखडलेल्या या बदल्या अखेर पालघर जिल्ह़ा परिषदेने ठाणे जिल्ह्यात केल्या असून ते शिक्षक नेमून दिलेल्या शाळेत हजर झाले आहेत.जिल्हा विभाजनानंतर दोन्ही जिल्ह्यात आकृतीबंधनुसार शिक्षकांची पदे समान ठेवण्याच्या निर्णय मागील वर्षी झाला. त्यास अनुसरून ठाणे जिल्ह्यातील काही शिक्षकांची पालघरमध्ये बदली करण्यात आली. मात्र, पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे त्यावेळी शिक्षकांच्या बदल्या पालघर जिल्हा परिषदेने थांबवल्या होत्या. आता त्यांच्याकडे पुरेसे शिक्षक असल्यामुळे जिल्हा विभाजनानंतर आवडीच्या जिल्ह्यात राहणे पसंत करणाऱ्या विकल्पानुसार १०३ शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितले.जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये १३८ शिक्षकांच्या बदल्या पालघर जिल्हा परिषदेने ठाणे जिल्ह्यात केल्याची चर्चा शिक्षक वर्गात आहे. परंतु, ते केवळ १०३ शिक्षक असून ते आधीच यायला पाहिजे होते ते आता हजर झाले आहेत. या पालघरच्या शिक्षकांना आता शहराजवळच्या शाळा मिळणार असल्याची चर्चादेखील जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये आहे. मात्र, यास मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दुजोरा दिला नाही.कारण आधीच ठाणे जिल्ह्यात सेवाज्येष्ठतेसह अन्य कारणाखाली काही शिक्षकांवर अन्याय झालेला असून तो दूर करावा, असे न्यायालयाने विभागीय आयुक्तांना आदेश दिले आहेत. त्यानुसार १० मे रोजी विभागीय आयुक्तांकडे या शिक्षकांची सुनावणी होईल. त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार व तक्रारीस अनुसरून या शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात येईल असे सांगितले होते.

टॅग्स :Teacherशिक्षकpalgharपालघरthaneठाणे