शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

परिवहनचे कामगार पुन्हा संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 3:36 AM

चर्चेत मान्य केल्यांतरही दहा बडतर्फ कामगारांना कामावर घेण्यास ठेकेदाराने आयत्यावेळी नकार दिल्याने परिवहन सेवेच्या कामगारांनी गुुरुवारी रात्रीपासून पुन्हा काम बंद आंदोलन केले.

वसई : चर्चेत मान्य केल्यांतरही दहा बडतर्फ कामगारांना कामावर घेण्यास ठेकेदाराने आयत्यावेळी नकार दिल्याने परिवहन सेवेच्या कामगारांनी गुुरुवारी रात्रीपासून पुन्हा काम बंद आंदोलन केले. गुरुवारी रात्रीपर्यंत कोणताचा तोडगा न निघाल्याने परिवहनची बससेवा बंद होती.वसई विरार महापालिकेच्या ठेका पद्धतीवर चालत असलेल्या परिवहन सेवेच्या कामगारांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले होते. बुधवारी रात्री मागण्या मान्य झाल्याने कामगारांनी बंद मागे घेत काम सुरु केले होते. मात्र, गुरुवारी सकाळपासून संपकरी कामगार आणि ठेकेदारात बडतर्फ करण्यात आलेल्या दहा कामगारांना पुन्हा कामावर घेण्यावरून वाद सुरु झाला होता. बुधवारच्या चर्चेत आयुक्त सतीश लोखंडे यांनी बडतर्फ कामगारांना पुन्हा कामावर घेतले जाईल, असे स्पष्ट सांगितले होते. मात्र, गुरुवारी ठेकेदाराने बडतर्फ करण्यात आलेल्या कामगारांना कामावर घेण्यास नकार दिला. त्यामुळे गुरुवारी रात्रीपासून कामगारांनी पुन्हा काम बंद आंदोलन सुरु केले.शुक्रवारीही काम बंद आंदोलन सुरुच राहिल्याने शहरातील बससेवा ठप्प झाली होती. शुक्रवारी रात्रीपर्यंत श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी , आयुक्त आणि ठेकेदारांमध्ये चर्चेच्या फेºया झाल्या. मात्र, बडतर्फ कामगारांची चौकशी करूनच त्यांना कामावर घेतले जाईल, अशी भूमिका ठेकेदार आणि प्रशासनाने कायम ठेवली. तर संघटनेने कामगारांना कामावर घेतल्याशिवाय बस सेवा सुरु करणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यावर कोणताच तोडगा न निघाल्याने शुक्रवारी रात्रीपर्यंत संप सुरु होता.>हा तर आडमुठेपणाबससेवा बंद झाल्याने विद्यार्थी शाळेत जाता येत नसल्याने महापालिका मुख्यालयाबाहेर बसून होते. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थी आणि पालक यांना घेऊन आयुक्तांशी चर्चा केली. शालेय बस वाहतूक सुरु करा. संघटनेचे कामगार फुकट काम करतील अशी भूमिका संघटनेने घेतली होती. पण, तीही प्रशासनाने धुडकावून लावल्याचे विवेक पंडित म्हणाले.