आशिष राणे
वसई - वसई विरार शहरात मंगळवारी रात्री व बुधवारी देखील झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे व त्यासोबत सोसाट्याच्या वादळी वाऱ्यांमुळे शहरांतील 6 ठिकाणी 24 झाडे कोसळली तर 9 सर्प पकडल्या ची वर्दी पालिकेला प्राप्त झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव यांनी लोकमत ला दिली आहे.
नशीब बलवत्तर म्हणून वसई विरार शहरात कुठे ही जिवीत हानी झाली नाही मात्र ठीकठिकाणी छोटी मोठी झाडे उन्मळून पडली परंतु कुठं ही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही यात प्रामुख्याने विरार कोपरी चंदन सारं मुख्य रस्त्यावर मंगळवारी रात्री उशिरा एक मोठे झाड कोसळले त्यामुळे वाहतुक कोंडी झाली रात्र असल्याने अडचण झाली नाही तरीही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कटर मशीन व कुऱ्हाडीने झाड कापून सकाळी मुख्य रस्ता मोकळा करून दिला.
दरम्यान मागील चार दिवस झाले शहरात रविवार पासून पाऊस व वारा सुटला आहे त्यामुळे झाडाची पडझड सुरूच आहे,मंगळवारी रात्री व बुधवारी देखील हा पडझडी चा प्रकार सुरूच होता. यामध्ये अग्निशमन दलाच्या विविध 6 केंद्रात वसई विरार व नालासोपारा येथून झाड व सर्प असल्याच्या वर्दी मिळाल्याने आणीबाणी व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे.यामध्ये शहरातील मुख्य अग्निशमन केंद्र असलेल्या आचोळे केंद्र ,बोळीज विरार पश्चिम ,फुलपाडा विरार पूर्व, ,श्रीप्रस्थ नालासोपारा पश्चिम ,सनसिटी दिवाणमान, व तांमतलाव ,वसई गाव अशा 6 ठिकाणी एकूण 24 झाडे कोसळली व 4 ठिकाणी 9 सर्प मिळून आले असल्याची माहिती वसई विरार महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांनी लोकमत ला दिली.
अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागात मिळालेल्या झाड पडण्याच्या व सर्प पकडल्याची आकडेवारी!
मुख्य अग्निशमन केंद्र झाड सर्पआचोळे केंद्र 8 3
बोळीज, विरार (पश्चिम) 3 1
फुलपाडा ,विरार (पूर्व ) 1 -
श्रीप्रस्थ नालासोपारा पश्चिम 2 3
सनसिटी दिवाणमान, 4 2
तांमतलाव ,वसई गाव 6 -
वरुण अग्निशमन केंद्र,वालीव -
एकूण झाड पडल्याची वर्दी :- 24एकूण सर्प पकडल्याची वर्दी :-09