विक्र मगड : पावसाची रिमझिम सुरु झाली की, पावसाळ्यात भिजून पहिल्या पावसाची मजा लुटण्यासाठी व मनमुराद भिजण्याचा आनंद घेण्यास सर्वानाच आवडते. मात्र आॅफिस, कॉलेज, शाळांमध्ये जातांना पावसाळ्यात छत्रीही घ्यावीच लागते. या अनुशंगाने येथील बाजारपेठा गजबजल्या असून लांब, आखुड व डिझायनर दांड्याच्या छत्र्यांना पसंती मिळत आहे. महागाईचे कारण देत दुकानदारांनी छत्र्यांच्या किमतीचे दर वाढवल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे.विक्र मगड व परिसरात जूनच्या दुसऱ्या आठवडयापासून ते पुढील दोन महिने पावसाचे प्रमाण जास्त असते. या वर्षी दुसरा आठवडा संपत आला तरी तालुक्यात पाहिजे तशी पावसाला सुरुवात झाली नसली तरी येत्या चार-पाच दिवसात दमदार पावसाला सुरवात होईल असा आंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.यंदा छत्री खरेदी करतांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. थ्री फोल्डपासून ते लांब दांडाच्या रंगीबेरंगी विविध आकारात डिझाईनमध्ये छत्र्या बाजारात उलब्ध झाल्या आहेत. १०० रुपयांपासून ते ८०० रु पयांपर्यतच्या दरात उपलब्ध आहेत. पावसाळ्याच्या आगमनाची जोरदार तयारी विक्र मगड व परिसरात सुरु झाली असून बच्चे कंपनीपासून ते लहान मोठ्यांपर्यत त्याची झळ पोहचलेली दिसत आहे. घरांची डागडुजीही कामे झाली असून कौलांची स्वच्छता, कौलांवर अगर पत्र्याच्या ज्या बाजूस गळण्याचा संभव आहे. तेथे प्लास्टीकचे कापड घालणे, डांबर घालणे, ही कामे ग्रामीण भागात झाली असली तरी आता प्रतीक्षा आहे ती पावसाची. याचबरोबर बच्चे कंपनीची शाळा १७ तारखेला सुरु होणार असल्याने आता पालकांसह बच्चे कंपनीचा मोर्चा खरेदीकडे वळला आहे. त्यातच सुरुवातीला असलेल्या भावात खरेदी करण्याकडे बहुतेकांचा कल असतो. कारण पुढे याच वस्तुंच्या किंमती पुढे वाढण्याचीही शक्यता असते. म्हणूनच शालेय खरेदी बरोबरच छत्रीचीही खरेदी केली जात आहे. सध्या विक्र मगडच्या बाजारात विविध प्रकारच्या छत्र्या उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या छत्रीमध्ये बºयाच साईज आहेत.छत्र्यांचे दर :लहान मुलांची छत्री- १०० ते १५० रु पयांपर्यतमहिला छत्र्या- थ्री फोल्ड २५० ते ३५० रु पयांपर्यतडबल कोटिंग - १५० ते २५० रुपयांपर्यत छोटी- १५० ते २०० रुपयांपर्यत फ्रील छत्री- ३०० ते ५०० रु पयांपर्यतलांब दांडी- २०० ते २५० रु पयांपर्यत
विक्रमगडमधे छत्री खरेदी तेजीत, किमती वधारल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:48 PM