शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

गोठणपूरच्या दांडेकर मैदानात आदिवासींचे बिऱ्हाड

By admin | Published: May 10, 2016 1:49 AM

गोठणपूर भागातल्या दांडेकर मैदानात मोखाडा, विक्रमगड व जव्हार अशा खेडोपाड्यातून शेकडो आदिवासी कुटुंबीय पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत झालेले असून ते संपूर्णत

निखिल मिस्त्री, पालघर/नंडोरगोठणपूर भागातल्या दांडेकर मैदानात मोखाडा, विक्रमगड व जव्हार अशा खेडोपाड्यातून शेकडो आदिवासी कुटुंबीय पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत झालेले असून ते संपूर्णत: पुन्हा एकदा झोपडीमय झाले आहे. हे स्थलांतरण गेल्या अनेक वर्षांपासून सुरुच आहे. पण यावर्षी मात्र स्थलांतरीतांचा आकडा वाढला आहे. ही शेकडो कुटुंबे आपल्या पोराबाळांच्या शिक्षणाची फिकीर न करता रोजगार मिळविण्यासाठी इथे येतात . मजुरी, नाका कामगार, बिगारी, वाडीची कामे, बांधकाम व्यावसायिकांकडे नानातऱ्हेची कामे करतात. भुकेलेल्या पोटाकडे न बघता दिवसभर कडाक्याच्या उन्हात हे लोक काम करीत असतात. आजही रोजगारासाठी स्थलांतर झालेले हे लोक पूर्ण दिवस खपून २०० ते ३०० रुपये प्रतिदिन कमवतात गावातल्या उपासमार करणाऱ्या बेकारीपेक्षा शहरातील तुटपुंजी मजुरी बरी असे हे लोक म्हणत आहेत. या कुटुंबातील मुले-मुली शिक्षण सोडून पडेल ती कामे करून घर खर्चाला हातभार लावत असतात. ज्या लोकांनी मनरेगा अंतर्गत कामे केली आहेत, अशांना अजूनही मजुरीच मिळाली नाही. म्हणून हे लोक अशा योजनांची आस न करता पोटची खळगी भरण्यासाठी आपली घरे-दारे बंद करून दोन पैसे मिळतील या आशेने शहरी भागात स्थलांतरण करून राहतात.