- रवींद्र साळवे मोखाडा : तालुक्यातील सात हजार ६२४ आदिवासी पाड्यांवर वीज पोहोचलीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे विकासाची वल्गना करणाऱ्या प्रशासनाची पूर्णत: वाभाडे निघाले आहेत. शासनाने मोठा गाजावाजा करत प्रत्येक खेड्यात वीज पोहोचवण्यासाठी कार्यान्वित केलेली राजीव गांधी विद्युुतीकरण व युती सरकारने नामकरण केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना फोल ठरल्या आहेत.तालुक्यातील रुईपाडा, वागंणपाडा चिकाडीपाडा जांभळीपाडा पोºयाचापाडा बिहरोबाचीवाडी जंगलवाडी गणेशवाडी कोलेधव वंगणपाडा तूळ्याचापाडा अशा पाड्यामध्ये आदिवासी विजेपासून वंचित आहेत. पण या पाड्यांवर वीज जोडणीचे कामे सुरू असल्याची माहिती महावितरण देत असले तरी आम्हाला वीज सेवा मिळणार कधी, असा सवाल विचारला जात आहे.
आदिवासी पाडे विजेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 6:14 AM