शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

आदिवासी विद्यार्थी घडविणार

By admin | Published: August 12, 2016 1:24 AM

प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवणारे विद्यार्थी आदिवासी समाजात आहेत. त्यांचे आयआयटी, इंजिनिअर, डॉक्टर होण्याचे स्वप्न

ठाणे : प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवणारे विद्यार्थी आदिवासी समाजात आहेत. त्यांचे आयआयटी, इंजिनिअर, डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे आदिवासी विभागाने निश्चित केले असून येत्या ५ वर्षांत दीड लाख आदिवासी मुलांना राज्यातील नामांकित शाळांमधून शिक्षण देऊन उद्याची ज्ञानी आणि आधुनिक पिढी आम्ही घडविणार आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त येथील गडकरी रंगायतनमध्ये भारतरत्न डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा विस्तार आणि गुणवंत विद्यार्थ्यांंच्या सत्कार कार्यक्र मास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्र मास आदिवासी मंत्री विष्णू सवरा, पालकमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, आदिवासी राज्य मंत्री राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव अत्राम, महापौर संजय मोरे, अनुसूचित जमाती कल्याण समतिीचे अध्यक्ष रु पेश म्हात्रे, युनिसेफच्या राज्य प्रमुख श्रीमती राजेश्वरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले, वीर बाबुराव शेडमाके या चंद्रपूरच्याआदिवासी तरु णाने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी इंग्रजांविरु द्ध आवाज उठविला. तर इकडे भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. चले जाव चळवळीचे स्मरण करीत असतांना या दोघांनी केलेल्या संघर्षाचे योगदान कायम लक्षात राहील. आदिवासी महिलांमध्ये योग्य आहाराअभावी कुपोषण आढळते. त्यामुळे त्यांची मुलेही कमजोर होतात. शारीरिक वाढ बरोबर नसेल तर त्याचा परिणाम बौद्धिक वाढीवर होतोच. मध्यंतरी आम्ही उचललेल्या काही पावलांमुळे ही परिस्थिती सुधारत असून हेल्थ इंडिकेटर चांगले आले आहेत मात्र त्यात अधिक सुधारणा करण्यासाठी आम्ही अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा विस्तार केला आहे आणि आता अगदी बाळंत झाल्यावर ६ महिन्यापर्यंत आम्ही त्या मातेला पोषक आहार देण्याचा प्रारंभ केला आहे. अंगणवाडी ही बाळ आणि आई यांची यशोदा माता आहे असे सांगून महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, स्मार्ट अंगणवाडी ही योजना शासन राबविणार असून त्यामुळे अंगणवाडीतर्फे देण्यात येणाऱ्या चौरस आहाराला ख-या अर्थाने महत्व प्राप्त होणार आहे. या चौरस आहारामुळे बाळ आणि माता यांचे संगोपन व्यवस्थित होऊन भावी पिढी सशक्त घडू शकेल. आजच्या कार्यक्र मात मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने पाये या गावात अमृत आहार योजनेच्याटप्पा-२ चा शुभारंभ केला व या गावातील सरपंच आणि आंगणवाडी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. १३ हजार ५०० अंगणवाडयात पहिल्या टप्प्यामध्ये ही योजना राबविली गेली. आता दुसरा टप्पा सुरु होत असून गरोदर मतांना आणि ६ महिने ते ७ वर्षे वय असणाऱ्या बालकांना या योजनेचा लाभ मिळेल,असे प्रधान सचिव देवरा यांनी सांगितले. शेवटी आदिवासी विकास आयुक्त राजीव जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.(वार्ताहर) १० वीमध्ये पहिल्या आलेल्या विजया धूमचा आणि विश्राम वागदान याचा ४५ हजाराच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला तर भावना राठोड आणि अजय गायकवाड यांना प्रत्येकी ३५ हजार तर तिसऱ्या आलेल्या रोहिणी बुंबाडे आणि तानाजी गावीत यांना २५ हजाराचे पारितोषिक देण्यात आले.१२ मध्ये पहिल्या आलेल्या वैशाली गिरमे आणि चिरायू नाईक यांना ४५ हजार रेणुका भोईर आणि सुरेश कवटे यांना ३५ हजार आणि मीनल मडावी व गणपत वाघमारे यांना २५ हजार रोख देण्यात आले. आकाश तारे, भारती चौधरी, हेमंत सारा यांचा आयआयटीसाठी निवड झाल्याबद्धल तर युपीएससीमध्ये महसूल अधिकारी म्हणून निवड झालेल्या अजय खर्डे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.आपल्या भाषणात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, १९९५ पासून आदिवासी समाजाला मूळ समाजात स्थान मिळावे म्हणून ९ आॅगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. शासन आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी १७०० कोटी रुपये खर्च करते याचाच अर्थ विद्यार्थ्यांंना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी ही गुंतवणूक केली जात आहे. हे विद्यार्थी स्पर्धेत उतरून समाजाचा एक घटक व्हावा या हेतूने शासनाचे काम चालू असून राज्यात कुपोषित माता आणि बालक राहणार नाही यासाठी शासनाने आदिवासी आणि वनवासींसाठी ही योजना आखलेली आहे.आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा म्हणाले की, यावर्षी स्पर्धेत टिकण्यासाठी २५ हजार विद्यार्थ्यांना नामांकीत शाळेत प्रवेश देवून त्याचा खर्च विभाग करणार आहे.आदिवासी संस्कृती टिकविण्यासाठी वारली हाट योजना मनोर या गावात राबविण्यात येणार आहे. राज्यातील वसतिगृहांची कमी संख्या लक्षात घेऊन वसतीगृहाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व भोजनाची सोय करण्यात येणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांना देशातच नाहीतर परदेशात शिक्षणासाठी पाठविण्याची योजना आखली जात आहे. तसेच आदिवासी खेळाडूंना क्रीडापटूंसाठी देण्यात येणारे २५ गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.