वाडा : अबिटघर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आदिवासी पाडयांना घातक प्रदुषणाने विळखा घातल्याने येथील आदिवासीच्या जीवाशी खेळ सुरु आहे. एकिकडे धनदांडग्या कारखानदारांची मॅनेजमेंट व त्यांचे हात मजबूत करणारे गावातीलच आश्रीत यांच्यामुळे ग्रामपंचायत सुद्धा हतबल दिसत आहे. या संदर्भात सोमवारी प्रदुषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) अधिकारी येथे भेट देणार असून त्याची सुनावणी तहसीलदार कार्यालयात होणार आहे.येथील प्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर असून आता एमपीसीबीचे अधिकारी तरी अन्यायग्रस्त आदिवासी शेतकºयांना न्याय देतील का या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथील सनशाईल पॅपटेक प्रा.लि. ग्रिनटेक मेटल रिसायकल्स प्रा.लि., जय जगदंबा, हिगोट आॅईल फिल्टरचे उत्पादन घेणारे व रासायनिक सांडपाणी व धुर सोडणारे काराखाने राणशेतपाडा, कडवपाडा, नडगेपाडा, दौडेपाडा या आदिवासी पाडयांलगत असल्याने येथील गावकºयांच्या आरोग्यावर तसेच शेती व जनावरांवर त्याचे दुष्परिणार होत आहेत.पाणी पिण्याची समस्या, या पाण्याने अंघोळ केली तर अंगाला खाज येत, अनेकदा आवाज व दुषित हवा यामुळे लहान मुले झोपेतुन उठुन बसतात. घराच्या बाहेर निघाल्यास प्रचंड उग्र वास येतो. त्यामुळे येथील आदिवासी मेटाकुटीला आले आहेत.कारवाई करा अन्यथा आंदोलनचा पर्यायअबिटघर गाव तसेच परिसरात सायंकाळनंतर दुरु होणारे वायू प्रदुषण सकाळपर्यंत असते. याकाळात कोणतीही शासकीय यंत्रणेचा अंकुश नसल्याचे प्रदुषणाचे स्तर अतिउच्च असते. मात्र अद्याप तरी कंपनी मालकां विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्रस्त गावकºयांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
व्यथा आदिवासींची :आबिटघरच्या प्रदुषणाचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:09 AM