तलासरी : आमच्या शेतात जनावरे, बकऱ्या का सोडता याची विचारणा करावयास गेलेल्या आदिवासी युवकाला सात ते आठ गुंड प्रवृत्तीच्या तरूणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले या बाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून जखमी युवकाला सिल्व्हासा येथील विनोबा भावे रु ग्णालयात दाखल केले आहे. तलासरी सुतारपाडा येथील खाटिक समाजाचे काही जण अवैधपणे परिसरातील जनावरे खरेदी विक्र ी करतात व हि जनावरे आजूबाजूच्या आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात सोडतात ती पिकाचे नुकसान करीत असल्याने या बाबत विनोद लक्षी कोकेरा हा जाब विचारावयास गेला असता त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले, या वेळी त्यास सोडवण्यास गेलेल्या काही आदिवासी महिलां व तरु णांही मारहाण करून सुरा दाखवून त्यांनी धमकाविले. जखमी विनोद यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु डोक्यास दुखापत झाल्याने सिल्व्हासा येथे हलविण्यात आले घटनेची माहिती मिळताच खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, तलासरीच्या नगराध्यक्ष स्मिता वळवी तसेच नगरसेवक व मोठया संख्येने आदिवासी बांधव दवाखान्यात जमा झाला आमदार पास्कल धनारे यांनी आदिवासी युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या तरूणावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येत नाही तो पर्यंत पोलीस स्टेशन मधून हलणार नसल्याचे सांगताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करून हल्लेखोर तरूणांना पकडले या हल्लेखोरावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदारांनी पोलिसांकडे केली तलासरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सिराज साबण खाटिक, शाहरूख सिराज खाटिक, सलमान सिराज खाटिक, जुनेद सिराज खाटिक, अहमद सिराज खाटिक, युनूस कार्लूस शब्बीर शेख, अहमद रजा अकिल खाटिक याना अटक करून रविवार सकाळ न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली पोलिसांनी वेळीच कारवाई केली केली असती तर शनिवार संध्याकाळची घटना टाळता आली असती, शुक्रवारी या दोन गटात वाद होऊन प्रकरण पोलीस स्टेशनला गेले परंतु पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने न घेता सामंजस्य करून दोन्ही गटाला परत पाठवले त्यानंतर रागाने शनिवारी विनोद कोकेरा याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
आदिवासी युवकावर भीषण हल्ला
By admin | Published: January 02, 2017 3:38 AM