वाडा : वाडा-मनोर महामार्गावरील सापने येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास ट्रक व टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. मात्र त्यात कोणीही जखमी झाला नाही. अपघातानंतर ट्रक पलटी होऊन रस्त्यावर पडल्याने येथील वाहतूक काही काळ धिम्या गतीने सुरू होती. त्यामुळे दोन ते तीन किमी अंतरावर गाड्यांच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाडा-मनोर महामार्गावरील सापने येथे आज पहाटेच्या सुमारास ट्रक व टेम्पोत यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन अपघात घडला. सापने येथे यापूर्वीही अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. येथे अरूंद रस्ता असल्याने अपघात होत असताना सुप्रीम कंपनी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी खुपरी येथेही अरूंद रस्त्यामुळे अपघात झाला होता. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले होते. पहाटे अपघात होऊन ट्रक रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही काळ धिम्या गतीने सुरू होती. वाहतूक सुरळीत सुरू होण्यास साडे दहा वाजले. सध्या परिक्षा सुरू असल्याने व वाहतूक खोळंबल्यामुळे विद्यार्थाना पाच ते सहा किमी अंतराचा प्रवास पायी करावा लागला. त्यामुळे विद्यार्थाचे हाल झाले. (वार्ताहर )
सापने येथे ट्रक व टेम्पोचा अपघात
By admin | Published: March 21, 2017 1:34 AM