लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरारोड मध्ये रस्ता खचून ट्रक रुतल्याची तर भाईंदर मध्ये रस्ते खोदकाम केल्याने एक कार रुतल्याची घटना घडली आहे . यामुळे महापालिकेच्या भोंगळ कामांवर टीका होत आहे .
मीरारोडच्या कनकिया , सिनेमॅक्स जंक्शन जवळ गुरुवारी रस्त्याच्या मधोमध एका ट्रक रस्ता खचल्याने रुतला . रस्त्या खचून त्यात ट्रकची चाके रुतली . भर रस्त्यात ट्रक अडकल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला . अखेर क्रेन मागवण्यात आली व त्या नंतर ट्रक बाहेर काढण्यात आला .
भाईंदर पश्चिमेस शिवसेना गल्ली जवळील मुख्य रस्त्याचे खोदकाम भूमिगत गटार वाहिनी टाकण्यासाठी केले गेले . त्यावर टाकलेली माती बसलेली नसल्याने बुधवारी रात्री शशिकांत नगर समोर एक कार माती खचल्याने रुतून बसली . लोकांनी कर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र शक्य झाले नाही . शेवटी क्रेन ने कार बाहेर काढण्यात आली.
शहरात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची कामे सुरु असल्याने रस्ते - गटार खोदून ठेवण्यात आले आहेत . त्यातच आधी केलेले रस्ते खचण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे .