पालघर : आपल्या देशाची खरी ताकद एकात्मतेमध्ये असून त्यावर देशाची अखंडता टिकून आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता जोपासणे व वृद्धिंगत करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी ध्वजवंदनानंतर केलेल्या भाषणात व्यक्त केले.पालघरच्या पोलीस मैदानावर ६८ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सवरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस अधीक्षिका शारदा राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यासह माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित अनेक विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी पोलीस दलाचे, एन.सी.सी. महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरी सरंक्षण दल संचलन झाले. या संचलनाचे नेतृत्व निमित गोयल उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले. या संचलनामध्ये देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये वन विभाग डहाणू यांनी वणवा प्रतिबंधक संरक्षण चित्ररथ, तहसील कार्यालय पालघर यांनी मतदार जागृती व्हॅन चित्ररथ, तसेच शिक्षण विभाग, आरोग्य विभाग या विभागांनी चित्ररथाव्दारे प्रबोधन केले.- अधिक छायाचित्रे / ३
‘देशाची खरी ताकद एकात्मतेमध्ये’
By admin | Published: January 28, 2017 2:31 AM