वाडा : या तालुक्यासाठी वेगळी कृषी उत्पन्न बाजारसमिती निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी येथे दिली.शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहा, शेतकऱ्यांचा अर्थिक स्तर उंचावला तरच सेवा सहकारी संस्थांचे कार्य सफल होईल, असे प्रतिपादन त्यांनी वाडा येथे केले.अटल महापणन विकास अभियाना अंतर्गत वाडा येथे तालुकास्तरिय कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे बाळासाहेब देशमुख, ठाणे जिल्हा बँकेचे संचालक निवेश भोईर,माजी संचालक ना.पा.पाटील आदींनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांचे चेअरमन, सचिव तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांना आपल्या गावातच खते, बियाणे, औषधे व औजारे उपलब्ध करु न देण्यासाठी विविध सेवा सहकारी संस्थांनी प्रयत्न करावेत, (वार्ताहर)
वाडा बाजार समितीसाठी प्रयत्न
By admin | Published: February 15, 2017 4:23 AM