राहुल वाडेकरविक्रमगड : जिल्ह्यÞातील विक्रमगड तालुक्यात शेतकºयांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतकºयांकडून तुरीची मोठया प्रमाणात लागवड करण्यात आली होती. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून शेतकºयांना तसेच काही वस्त्यांना स्वस्तात तूर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे दर वर्षी खरीप हंगामात मोठया प्रमाणात आंतरपीक म्हणून तुरीचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. तुरीतील पोषक घटकांमुळे कुपोषणावरही मात करण्यास मदत होणार आहे.या तालुक्यात पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. त्यातून येणारे उत्पन्न अत्यंत मर्यादित असते. काही शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने शेती करीत असले तरी केवळ भातशेतीवर अवलंबून राहणे त्यांनाही आता कठीण होऊन बसले आहे. त्यात भात शेती मध्ये उत्पादन खर्च जास्त तर पैसे कमी मिळतात. त्यामुळे काही शेतकरी बांधावर तुरीची लागवड करत आहेत.यामुळे शेतकºयांना आंतरपीक आणि इतर पिकांचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून शेतकºयांना तूर, कडवे वाल, हरभरा, उडीद लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन त्यांना उत्पादन वाढवण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. त्याचा फायदा येथील शेतकºयांना होताना दिसू लागला आहे.यामुळे शेतकºयांना तुरीचा लाभ घेण्याबरोबरच अतिरिक्त तुरीची विक्र ी करून त्यातून आर्थिक फायदा मिळवण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. या प्रयोगाचे अनुसरण आता अनेक शेतकरी करू लागले आहेत.
ग्रामीण भागात तुरीचे बंपर पीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:02 AM