शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

जनजागृती मोहीम राबविल्यामुळे मतदानाचा टक्का वाढला; कोरोनाच्या सावटातही ८१ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:50 AM

याआधीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी पाहिली तर ग्रामपंचायतीसाठी झालेले मतदान खूपच जास्त आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यात तीन ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये मतदारांनी कोरोना प्रादुभावाचे संकट असतानाही मोठ्या संख्येने मतदान केल्याचे दिसून आले. यावेळी ८१.४५ टक्के मतदारांनी मतदान केले. यावरून प्रशासनाने जनजगृती राबविल्यामुळेच मतदानाचा टक्का वाढला असल्याचे स्पष्ट होत आहे.

याआधीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी पाहिली तर ग्रामपंचायतीसाठी झालेले मतदान खूपच जास्त आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ६३.७३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्येही ६१.५३ टक्के मतदारांनी मतदान केले होते. विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ५९.३२ टक्के मतदारांनी मतदान केले होते, तर २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत साधारणत: तेवढेच म्हणजे सरासरी ६० टक्के मतदान झाले होते, असे सांगण्यात आले.

मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत अलीकडेच ग्रामपंचायतींसाठी झालेले मतदान साधारणत: २० टक्क्यांनी जास्त असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या दरम्यान जनजागृती मोहीम राबवली जात असते. विविध उपक्रमातून जागृती केली जाते. त्याचा मतदानावर काही प्रमाणात परिणाम नक्कीच होत असतो, त्यातूनच मतांची टक्केवारी वाढत असते.

लोकसभेसाठी मतदानपालघर जिल्ह्यात एकच लोकसभा मतदारसंघ असून २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ६३.७३ टक्के मतदान झाले होते. त्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गावित निवडून आले होते. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा पराभव केला होता.

विधानसभेसाठी मतदानपालघर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात बविआचे तीन आमदार निवडून आलेले असून राष्ट्रवादी एक, कम्युनिस्ट एक आणि शिवसेना एक असे बलाबल आहे. २०१९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये साधारणत: ६० टक्केच मतदान झाले होते.

ग्रामपंचायतीसाठी मतदानग्रामपंचायतीसाठी उभे राहणारे उमेदवार हा स्थानिक असल्याने त्यांना बहुसंख्य मतदार ओळखत असतात. त्यामुळे प्रत्येक घरातील मतदार मतदानासाठी बाहेर पडावेत यासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते स्वत: प्रयत्न करीत असतात, ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची बाब आहे.

टॅग्स :Votingमतदान