वसई : नायगाव परिसरात रस्त्यालगत ठेवण्यात येणाऱ्या मोटार सायकलस्वारांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. तर बेकायदा रिक्षांवर कारवाई होत नसल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. नायगाव पश्चिमेला पार्किंगसाठी जागा अतिशय अपुरी असल्याने मोटारसायकली आणि चारचाकी गाड्या रस्त्यालगत ठेऊन शेकडो लोक जातात. या गाड्या पहाटेपासून रात्रीपर्यंत रस्त्यावर बेवारसपणे ठेवल्या जातात. जागा नसल्याने वाहनचालक आपल्या महागड्या गाड्या रस्त्या कडेला कित्येक वर्षांपासून ठेवत आहेत. त्यातच जुलै महिन्यापासून कोसळलेल्या पावसामुळे नायगाव रेल्वे पार्किंगमध्ये पूर्ण पाणी साचून राहिले आहे. तसेच येथे पर्यायी पार्किंग जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला आपली वाहने पार्किंग करू लागला आहे. गेल्या महिन्यापासून वाहतूक पोलिसांनी यावर कारवाई करीत दंड’ वसूल करायला सुुरुवात केली आहे. रात्री कामावरून परतलेल्या चाकरमान्यांना याचा चांगलाच फटका बसला. पर्यायी व्यवस्था नसतांना झालेली कारवाई अन्यायकारक असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. मात्र ही वाहने रस्त्याच्या कडेला काढण्यात आलेल्या सफेद पट्ट्या बाहेर असल्याच्या तक्रार असल्याने कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शिस्तबद्ध पार्किंग केलेल्या वाहनांना अनेकवेळा रिक्षाचालक मुद्दामून रस्त्यावर आणून ठेवत असल्याने प्रवासी तसेच रिक्षा चालकांमध्ये बाचाबाची होत असते. अनेकवेळा गाडयांना मुद्दाम पाडण्यात येऊन त्यांची नासधूस करण्यात येते. रिक्षा स्टॅन्ड हा रेल्वेने आरक्षित अॅम्ब्युलन्स पार्किंगमध्ये उभारला गेल्याने तो बेकायदेशीर असल्याच्या तक्रारी रेल्वेकडे करूनही कुठलीच कारवाई केली जात नाही. राज्य सरकारकडून रेल्वे परिसरात उभी केलेली मोफत अॅम्ब्युलन्स अनेकवेळा याच रिक्षा स्टॅन्डमुळे अडकून पडत असते. तसेच रस्त्यामध्ये बेशिस्तपणाने रिक्षा उभ्या केल्या जात असतांना त्यावर वाहतूक पोलीस का कारवाई करीत नाही? असा सवाल प्रवासी वर्ग विचारू लागला आहे. (प्रतिनिधी) सगळ्यांना समान न्याय लावाच्वसई वाहतूक पोलीस निरीक्षकांनी अलीकडेच लावलेल्या सूचना फलका शेजारीच रिक्षा रस्त्यामधोमध उभ्या केल्या जात असतांनाही केवळ आपल्यावरच कारवाई का? अशी प्रवाशांमध्ये चर्चा आहे. रिक्षांमध्ये ५ प्रवासी भरून वाहतूक केली जाते त्याकडे दुर्लक्ष होते आहे. च्नेहमी दुचाकीचालकांना चौकशी तसेच दंड आकारणीला सामोरे जावे लागते. वाहतूक पोलिसांकडून सर्वांना समान न्याय देण्यात यावा याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या गेल्या आहेत. यावर कुठली कारवाई होते याकडे प्रवाशांचे लक्ष लागून आहे
दुचाक्यांना दंड, रिक्षांना अभय
By admin | Published: October 07, 2016 5:00 AM