शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

वसई पालिकेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:25 AM

साहाय्यक पालिका आयुक्त मात्र अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई-विरार शहर महापालिकेच्या एच प्रभाग समितीअंतर्गत चुळणे येथे एका विकासकाने टोलेजंग इमारती बांधून आरक्षण पडलेली जागा महापालिकेला बक्षीसपत्राने तर दिली, मात्र याच ईएसआर आरक्षित भूखंडावरील आरक्षण उठले नसतानाही त्या ठिकाणी बांधकाम सुरू करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, पाण्याच्या टाकीसाठी आरक्षित असलेला भूखंड बिल्डरने बक्षीसपत्राने कागदोपत्री तर हस्तांतरित केला, मात्र प्रत्यक्षात तो पालिकेला हस्तांतरित केला नसल्याचे नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

चुळणे येथील या जागेवर पूर्वी फलक होता, झाडेझुडपे वाढली होती, ती स्वच्छ केली असून तेथे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, या आरक्षण असलेल्या जमिनीवर कोण बांधकाम करते आहे, याची माहिती महापालिका ‘एच’ प्रभाग समितीचे ठेका बांधकाम अभियंता विवेक चौधरी, अतिक्रमण विभागाचे अभय चौकेकर आणि स्वतः साहाय्यक आयुक्त मनाली शिंदे यांना विचारली असता या ठिकाणी सुरू असलेले काम महापालिकेचे नाही. आम्ही ते काम लागलीच थांबवले आहे, अशी माहिती साहाय्यक आयुक्त मनाली शिंदे यांनी दिली.भूखंड पालिकेच्या मालकीचा असताना आरक्षित जमिनीवर पालिकेचे ई.एस.आर. बाधित (पाण्याच्या टाकीची जागा) असे आरक्षण पडले आहे. असे असताना पालिकेने स्थानिक व माजी नगरसेवकांच्या लेखी पत्रावरून या जागेवरचे पाण्याच्या टाकीचे आरक्षणच रद्द करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी महासभेत घेतला. मात्र, आजही तो निर्णय प्रलंबित आहे. 

पालिका आयुक्तांनीही घेतली नाही माहितीभूखंडावरील आरक्षण अजूनही उठलेले नाही. या आरक्षित भूखंडप्रकरणी तक्रार झाल्यावर तत्कालीन पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी तब्बल दोन वर्षांनी सुनावणी घेतली होती. मात्र, आता या सुनावणीला ४ वर्षे झाली, तरी सध्याचे आयुक्त गंगाथरन डी. यांनीसुद्धा या प्रकरणाची माहिती अद्याप नगररचना विभागाकडून घेतली नसल्याचे समजते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार