शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

मीरा भाईंदर महापालकेच्या राजाश्रया मुळे अनधिकृत बांधकामे हि भ्रष्टाचाराचा बक्कळ पैसा कमाईचे मोठे कुरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 7:53 PM

मीरा भाईंदर शहर हे पूर्वेस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित हरित वन पट्ट्याने वेढलेले आहे . तर उत्तर व दक्षिणेस खाडी तर पश्चिमेस समुद्राने वेढलेले आहे. 

मीरारोड / धीरज परब 

मीरा भाईंदर शहरात राजरोस अनधिकृत बांधकामे होतात ती स्थानिक नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यां पासून पालिका मुख्यालयातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा वरदहस्त असतो म्हणूनच . अनधिकृत बांधकामे हि भ्रष्टाचाराचा बक्कळ पैसा कमाईचे मोठे आणि झटपट कुरण बनलेले आहे . त्यामुळे अनधिकृत बांधकामे होऊन त्यांना सर्व सोयी सुविधा देखील महापालिकेसह नगरसेवक , राजकारणी प्राधान्याने पुरवत असतात . अनधिकृत बांधकाम प्रकरणी  लाच घेताना काही नगरसेवक व अधिकारी रंगेहाथ पकडले गेले तरी त्यांना न्यायालयातून शिक्षा होणे खूपच वेळखाऊ आणि अवघड असल्याने हे लाचखोर उजळ माथ्याने समाजात वावरत असतात . 

 

मीरा भाईंदर शहर हे पूर्वेस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित हरित वन पट्ट्याने वेढलेले आहे . तर उत्तर व दक्षिणेस खाडी तर पश्चिमेस समुद्राने वेढलेले आहे . अंतर्गत खाड्या तसेच कांदळवन, पाणथळ, सीआरझेड व इकोसेन्सेटिव्ह झोन पासून नाविकास क्षेत्र  असे मानवी आरोग्य , पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा संरक्षित परिसर आहे . शहरातील पूर स्थिती रोखण्यासाठी हे क्षेत्र भराव - बांधकामां पासून मुक्त ठेवणे गरजेचे आहे . तसे असताना ह्या प्रतिबंधित क्षेत्रात राजरोस बेकायदा भराव करून बेकायदेशीर बांधकामे केली जातात . सामान्य नागरिक , शेतकऱ्यांना ह्या क्षेत्रात परवानगी साठी कायदे - नियमांवर पालिका बोट ठेवते . पण बडे राजकारणी व बिल्डर असले तर सर्व नियम गुंडाळून पालिका त्यांना नियमबाह्य परवानग्या देऊन टाकते . 

 

हरित पट्ट्या व्यतिरिक्त आदिवासींच्या जमिनी , सरकारी जमिनी, नाविकास क्षेत्र , पालिका आरक्षणे ह्यात सुद्धा  पासून इमारतीच्या इमारती अनधिकृत पणे बांधल्या जातात . महापालिकेने मंजूर केलेल्या परवानग्यां व्यतिरिक्त बेकायदेशीर वाढीव बांधकामे केली जातात . नगररचना विभागात बिल्डर लॉबी बाबत देखील जमिनीची मालकी नसणे , खोटे दस्त बनवणे , खोटी माहिती,  मंजूर नकाशा व परवानगी पेक्षा वाढीव बांधकाम, आरजी - मोकळ्या जागा न सोडणे व त्यावरचे बेकायदा बांधकाम,  चटईक्षेत्र व टीडीआर घोळ, भोगवटा दाखला न घेणे व जमीन राहिवश्याना हस्तांतरित न करणे वा अन्य कोणाला विकणे आदी अनेक गैरप्रकार, घोटाळे  घडत असतात . नगररचना विभाग अनधिकृत बांधकाम बाबत सविस्तर अहवालच देत नाही . थातुर मातुर पत्र देऊन बेकायदा बांधकामास संरक्षण देण्याचे काम केले जाते . बांधकाम विभाग तर सर्रास दुरुस्तीच्या नावाखाली नियमबाह्य परवानग्या देऊन अनधिकृत बांधकामांना अधिकृत ठरवण्याचा भन्नाट प्रताप करत आला आहे . 

 

 

अनधिकृत बांधकामास सुरवात होत असताना त्या क्षेत्रातील संबंधित कनिष्ठ अभियंता पासून प्रभाग अधिकारी, नगररचना - बांधकाम विभाग आणि स्थानिक नगरसेवक बेकायदा बांधकाम त्वरित थांबवून ते पाडून टाकायची जबाबदारी बजावत नाही .  कारण अनधिकृत बांधकामाच्या क्षेत्रफळ व प्रकारा नुसार प्रत्येकाचे हप्ते ठरलेले असतात . अनधिकृत बांधकाम करणारे माफिया तर बांधकाम सुरु करण्या आधीच सर्वांचे खिसे गरम करतात . अनधिकृत बांधकाम करताना पालिका अधिकारी - कर्मचारी,  नगरसेवक , राजकारणी , तथाकथित पत्रकार - समाजसेवक आदींना वाटण्यासाठी पैशांची तयारी ठेवलेली असते . वाटणी मनासारखी नसेल तर अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी केल्या जातात . त्यातही पालिका अधिकारी व नगरसेवक देखील मध्यस्थीची भूमिका बजावतात . अनधिकृत बांधकामास संरक्षण देण्यासाठी चौरस फुटा प्रमाणे प्रोटेक्शन मनी सुद्धा ठरतो . तर काही बडे राजकारणी अनधिकृत बांधकामात अमुक क्षेत्रफळाच्या बांधकामाचा वाटा सुद्धा मागतात . 

 

अनाधिकृत बांधकाम झटपट करून ती रहिवासव्याप्त केली जातात.  बांधकामे पूर्ण होऊन पालिका मालमत्ता कराची आकारणी करून देते . त्यास वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या वीज पुरवतात तर महापालिका  व लोक्रतीनिधी यांच्या आशीर्वादाने नळ जोडण्या, दिवाबत्ती , गटार व रस्ता, शौचालय आदी सर्व सुविधा सहज पुरवल्या जातात.  अगदी नगरसेवक निधी सुद्धा वापरला जातो .  रहिवास व्याप्त अतिक्रमण व अनाधिकृत बांधकाम वर कारवाई करणेत नंतर टाळाटाळ केली जाते . पोलीस बंदोबस्त नसल्याची कारणे तर ठरलेली असतात . सरकारी जमीन असेल तर महापालिका शासनाची जबाबदारी सांगून अनधिकृत बांधकामांना संरक्षण देते . पण त्याच वेळी सदर सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकामांना मात्र सर्व सोयी सुविधा देताना शासनाची मालकी पालिकेच्या आड येत नाही . 

 

महापालिकेच्या विधी विभागाचा तर अनधिकृत बांधकामांना कायदेशीर संरक्षण देण्यात हातखंडा आहे . अनधिकृत बांधकामा वर कारवाई टाळण्यासाठी न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवला जातो . मग तर वर्षा नऊ वर्ष विधी विभाग न्यायालयीन खेळ खेळण्यात वेळ काढून अनधिकृत बांधकामा वरील कारवाई गुंडाळून टाकते . न्यायालयात पालिकेची बाजू मांडली जात नाही वा वकील हजर नसतात . अगदी मुंबई उच्च न्यायालयात अनधिकृत बांधकामावर कारवाईचा मार्ग मोकळा झालेला असताना पुन्हा खालच्या न्यायालयात खेळ सुरु केला जातो . अनेक वर्ष विधी विभागाच्या खेळात गेल्यावर ती बांधकामे जुनी असल्याचा सोयीचा जावाईअर्थ लावून बेकायदेशीर बांधकामे पाडली जात नाहीत . 

 

अनधिकृत बांधकामे शक्यतो शनिवार - रविवार किंवा सलग सुट्टीच्या दिवसात झटपट उरकली जातात . जेणे करून बांधकामाचा दर्जा सुमार असल्याने अपघाताचे प्रकार घडतात परंतु लोकांच्या जीवाशी सोयरसुतक नसते . अनाधिकृत बांधकामे खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होते.  कोट्यवधी रुपयांच्या पालिका व शासकीय जमिनी वर अतिक्रमण - अनाधिकृत बांधकामे होतात . विकास आराखड्यांचा बट्याबोळ होतो . मुलभूत सुविधा पुरवणे अवघड बनते . शहर बकाल होऊन लोकसंख्या व वाहन वाढीचा ताण असह्य होतो . परंतु अनधिकृत बांधकामे करणाऱ्या माफियांसह पालिका अधिकारी , नगरसेवक , राजकारणी, महसूल विभाग  ह्यांना मात्र त्याच्याशी काही सोयर सुतक नसते .  अनधिकृत बांधकामातून झटपट मिळणारा  भ्रष्टाचारी काळा पैसा हेच ह्यांचे सर्वस्व असते . 

 

महापालिका अधिनियमा नुसार तसेच उच्च न्यायालयाने विविध जनहित याचिकां मधील आदेश नुसार अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी व कर्तव्य हे प्रामुख्याने स्थानिक प्राधिकरण म्हणून महापालिकेचे व नगरसेवकांचे आहे . परंतु अनधिकृत बांधकामातून बक्कळ पैसा मिळवायचा आणि त्याला संरक्षण व सुविधा द्यायच्या अशी कर्तव्याची सोयीची व्याख्या पालिका अधिकारी व नगरसेवकांनी करून घेतलेली आहे . महापालिकेचे आयुक्त , अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त देखील अनधिकृत बांधकामास जबाबदार असणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांवर कठोर स्वरूपाची प्रशासकीय कारवाई करत नाही. जेणे करून अनधिकृत बांधकामे तातडीने पाडण्या ऐवजी त्याला संरक्षण देण्यातच धन्यता मानली जाते . त्यामुळे ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुद्धा हात ओले झाले नसतील तर नवलच असे वाटणे स्वाभाविक आहे . काही प्रमाणात कारवाई झाली तरी पुन्हा बेकायदा बांधकामे उभारली जातात . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर