शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

अनधिकृत शाळा मालक - चालकांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:40 PM

मुख्यमंत्र्यांनाही साकडे : विरार युवक काँग्रेसचे सीईओंना निवेदन

पारोळ : माहिती अधिकारात शिक्षण विभाग, पंचायत समिती वसई यांनी अनधिकृत शाळांची यादी दिली आहे. त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात १९० आणि एकट्या वसई तालुक्यात १५० अनधिकृत शाळा आहेत. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १५ जून २०१९ रोजीच्या पत्रान्वये या अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते.

तसेच संबंधित अनधिकृत शाळांना नोटीस बजावून शाळेच्या ठिकाणी अनधिकृत शाळा असल्याचा बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत, असे आदेश देताना आणि या शाळांमधील मुलांना मान्यताप्राप्त शाळेत दाखल करा, असे बजावताना त्यामध्ये कुठेही संबंधितांवर फौजदारी कारवाईचा उल्लेख केलेला आढळत नाही. या सगळ्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने फक्त आदेश देण्याचे आणि वरवरची कारवाई करण्याचे करण्याचे सोपस्कार पार पाडल्याचा आरोप विरार युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहसीन शेख यांनी केला आहे.शेख यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीप्रमाणे या अनधिकृत शाळा प्राथमिक स्तराच्या आहेत. परंतु, हे शाळा चालक आणि मालक या शाळा माध्यमिक शिक्षण देत आहेत. याबद्दल प्रशासन मूग गिळून गप्प असल्याचे शेख म्हणतात. बहुतेक अनधिकृत शाळा इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून आसन व्यवस्थेपेक्षा जास्त मुलांना एका वर्गात कोंबले जाते. इमारत बांधकामाची परवानगी न घेता शाळा इमारती उभारल्या आहेत. या शाळांमध्ये पडझड, गळती होत असते, तेथे साफसफाई, स्वच्छता राखली जात नाही. येण्या - जाण्यासाठीचे जिने अरूंद आहेत. अग्निशमनची व्यवस्था उपलब्ध नाही. शाळेलगतच बेकरी आहेत. शाळेतील मुलांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध नाही. शहरातील मुख्य रस्त्यालगत शाळेचे प्रवेशद्वार असून काही इमारतीतील जिने उतरले की सरळ मुले रस्त्यावर येतात, अशी भयाण वस्तुस्थिती असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी वसईच्या गटविकास अधिकाºयांना दिलेल्या आदेशांचे तत्काळ पालन करा तसेच अनधिकृत शाळेचे मालक - चालक तसेच त्यांना ना-हरकत दाखला देणाºया आणि त्यांना संरक्षण देणाºया विविध शासकीय, निमशासकीय विभागाचे अधिकारी आणि संबंधितांवर ताबडतोब फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे.शाळा सुरु होताना आणि सुटताना पालक व मुले सरळ रस्त्यावर येतात. यामुळे अपघात घडून जीवितहानी होण्याचा धोका आहे. शहरात वाहनांची संख्या बरीच आहे. एस.टी., महापालिकेची परिवहन सेवा, चार चाकी, दुचाकी वाहने, रिक्षा, मोठे ट्रक, पाण्याचे टँकर यांची वर्दळ दिवसभर सुरु असते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या सर्व प्रकारामुळे जर अपघात होऊन जीवितहानी झाली तर यास कुणाला जबाबदार धरणार असा सवाल त्यांनी केला आहे.

टॅग्स :SchoolशाळाVasai Virarवसई विरार