बोर्डी : रेतीमाफियाविरु द्ध लोकमतने बातम्यांच्या माध्यमातून आक्र मक पवित्रा घेतला आहे. तथापी या अवैध्य धंद्याशी निगडीत शासकीय विभागातील काही ‘हितचिंतकां’कडून या टोळ्यांना भूमिगत होण्याचा सल्ला दिल्याची चर्चा आहे.मान्सून पूर्व दीड महिन्याचा कालावधी हाती असल्याने बांधकाम व्यवसायाला तेजी आली आहे. जिल्ह्यात रेती उत्खननास बंदी असल्याने या व्यवसायाला रेतीचा पुरवठा अवैद्यरित्या केला जातो. त्यामुळे समुद्रातून रेती उपसणाऱ्या माफीयांच्या धंद्याला तेजी आलेली होती. नेमक्या या काळात लोकमतने हा विषय लावून धरल्याने माफिया आणि बांधकाम ठेकेदारांचा मनस्ताप वाढला असून त्यांच्या गुप्त बैठकी होत आहेत. या पूर्वी रेतीच्या कारवाई बाबतचा कानोसा घेणारे खबरे महसूल कार्यालयाच्या परिसरात फिरताना दिसत होते. शिवाय डहाणू-बोर्डी प्रमुख राज्य मार्गावरील आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डी या गावच्या नाक्यावर माफीयांनी हेर पेरले होते. त्या मध्ये महसूल आणि पोलीस विभागातील काही कर्मचाºयांचा त्यांना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. परंतु रेती चोरीचा विषय तहसीलदारांनीही गांभीर्याने घेत भरारी पथकं आणि जिल्हास्तरावरून विशेष पथक बोलविण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे रेती माफीयांशी लागेबांधे ठेवणाºया शासकीय विभागातील काही ‘हितचिंतकां’मध्ये कमालीची अस्वस्थता असून या चोरट्यांच्या टोळ्यांना काही दिवस भूमिगत होण्याचा सल्ला देण्यात आल्याचे वृत्त आहे.आमसभेत विचारणार जाब२७ एप्रिल रोजी आमसभा असून पर्यावरण प्रेमींकडून रेती चोरीचा विषय मांडताना लोकमतच्या बातमीची कात्रण लावण्यात येणार आहे.त्या मध्ये रेती चोर आणि त्यांना मदत करणाºया प्रशासनातील काही कर्मचाºयांच्या नावाचा उल्लेख केला जाण्याची शक्यता असल्याचे समजते.
‘हितचिंतकां’च्या सल्ल्याने रेतीमाफिया झाले भूमिगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:37 AM