- सुरेश काटेतलासरी : तालुक्यातील मैजे उधवा या गावी पाच वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेली नळपाणी पुरवठा योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून गत चार महिन्यांपासून गटार बांधणीच्या कामामुळे पुरवठा करणाºया पाईपलाईन तुटल्याने नळपाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे येथील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे.तालुक्यातील उधवा या गावी मोठी बाजारपेठेसह दोन महाविद्यालये, चार प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, दोन बॅका, आठ खाजगी दवाखाने एक प्राथमिक आरोग्यकेंद्र असून गावाच्या हद्दीवर नगरहवेली येथे औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे उधवा गावाची लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील पाणी समस्या लक्षात घेता ४५ लाख रुपये खर्च करून जलस्वराज्य योजने अंतर्गत पाणी पुरवठा विभागाने पाच वर्षापूर्वी पाणी पुरवठा योजना सुरु केली. मात्र गेल्या चार पाहिन्यापासून गटारीचे खोदकाम करताना पाण्याची पाईपलाईन तुटल्याने नळपाणी पुरवठा बंद झाला आहे.यासंदर्भात पंचायत समिती पाणी पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन तातडीने दुरु स्त करू असे तोंडी सांगण्यात आले, पण आज चार महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला तरी पाण्याची पाईपलाईन दुरुस्त न केल्याने नळपाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे येथील नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.कधी विजेची थकबाकी, कधी कमी दाबाने वीज पुरवठा, कधी पाईप लाईन फुटणे तर कधी पाण्याच्या मोटारमध्ये बिघाड अश्या या दुष्टचक्र ात ही नळपाणी पुरवठा योजना अडकल्याने येथील नागरिक त्रस्त आहेत. या बाबत विभागाचे उप अभियंता आर. ऐ. पाटील यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
उधवा येथील नळपाणीपुरवठा बंद; गटाराच्या कामात तुटलेली लाइन चार महिने नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 3:39 AM