- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : भौगोलिकतेनुसार स्थानिक पर्यावरणाला पूरक झाडांच्या पन्नासहजार बियांचे रोपण डहाणूच्या किनारी भागात करण्यात आले. दररोज मॉर्निंगवॉककरिता एकत्र येणाऱ्या ग्रुपने हा उपक्र म राबविला असून त्या मध्ये युवांसह सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे.पर्यावरण आणि आरोग्याचा निकटचा संबध आहे, या करिता सामूहिक मॉर्निंगवॉकला नियमित जाणाºाा डहाणूतील एका ग्रुपने पन्नासहजार बियांचे रोपण बुधवार, १३ जूनला सकाळी किनाºयालगतच्या मोकळ्या जागेवर केले. त्यांना डहाणू उपवन संरक्षक एन. लडकत यांनी मार्गदर्शन केले. तालुक्याच्या किनारीभागात हजारो ताडबियांचे रोपण करण्याचा अभिनव उपक्र म राबविणारे नरपड येथील पर्यावरण प्रेमी कुंदन राऊत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रत्यक्षात उतरला.स्थानिक झाडेच पर्यावरण रक्षणाचे काम करीत असून त्यामुळेच प्राणी आणि पक्षांचा अधिवास बहरतो या भावनेतून हा उपक्र म हाती घेण्यात आल्याचे राऊत म्हणाले.या वेळी आंबा, शिंदी, आपटा, चिंच, काटेरी रान बाभूळसह अन्य स्थानिक झाडांच्या बियांचे रोपण करण्यात आले. त्यासाठी एकही रुपया खर्च झालेला नाही, प्रत्येक नागरिकाने हा उपक्र म राबवावा, असे आवाहन या ग्रुपने तमाम जनतेला केले आहे.>कुंदन राऊत हा तालुक्यातील नरपड गावचा रहिवासी असून त्यांनी मागील सात वर्षापासून किनाºयावर ताडबिया रोपणाचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्याची बातमी लोकमतने प्रसिद्ध केली होती, शिवाय २०१५ च्या लोकमत वर्धापन दिनाच्या भरारी या विशेषांकात या विषयी लेख ही प्रसिद्ध केला होता. त्यामुळे हा उपक्रम जनमानसात पोहचला. त्यानंतर स्थानिक पोलीस, वन विभाग, ग्रामपंचायत, विविध संस्था आणि स्थानिक नागरिक एकत्र येऊन दरवर्षी जून ते जुलै या काळात किनारी भागात ताडबियांचे रोपण करीत आहेत. आजतागायत हजारोच्या संख्येने ताड बियांचे रोपण झाल्याने आगामी काळात हा हा परिसर हिरवागार झाल्याचे पाहायला मिळणार आहे.
पन्नास हजार बियांच्या रोपणाचा अनोखा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 2:50 AM